Measles : मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्या अधिक, ५० बालकं कस्तुरबा रुग्णालयात; कशी काळजी घ्यावी?

Measles : मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्या अधिक, ५० बालकं कस्तुरबा रुग्णालयात; कशी काळजी घ्यावी?

मुंबईतील गोवरचा उद्रेक बघायला मिळत आहे. मुंबईतील १२ विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. मागील एका दिवसात मुंबईत गोवरचे १२३ संशयित रुग्ण आढळले आहेत. अनेक संशयित रुग्णांना मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात ५० बालकं उपचार घेत असून, तर एक रुग्ण गंभीर असून व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Crime News : ३५ तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट, तरुणीच्या हत्येचा पाच महिन्यांनी उलगडा

हा संसर्गजन्य आजार असल्याने आणि बालकांना अधिक होत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेने यासाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे. नऊ महिन्यांचे बालक आणि १६ महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जाते.

हेही वाचा : 

Gold Rate : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी, चोवीस तासातदरात १५०० रुपयांची वाढ

सोमवारी मुंबईमध्ये आलेल्या केंद्रीय पथकाने पालिका रुग्णालये तसेच राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेविषयी विस्तृत माहिती घेतली तसेच भेटीही दिल्या. गोवर, रुबेलाच्या रुग्णांचा प्रसार केवळ एम वॉर्डमध्ये आहे की, इतर प्रभागांमध्येही याचीही वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. हा अहवाल केंद्रीय आरोग्य यंत्रणेला पाठवण्यात येणार असल्याचे कळते. गोवरमुळे तीन संशयित मृत्यूंची नोंद झाली असली तरीही पालिकेने अद्याप एकच नोंद निश्चित केली आहे.

 कशी घ्याल काळजी? 

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जीवनसत्व अ देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना जवळच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. ९ महिने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाची अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे. खासगी डॉक्टरांना व प्रभावशाली व्यक्तींना गोवर आजार तसेच लसीकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.लहान बालकांचा आहार चांगला ठेवा आणि स्वच्छता देखील राखावी. निदानासाठी रक्त आणि लघवीचे नमुने घेतले जातात, स्वॅबद्वारे चाचणी देखील केली जाते. चाचण्यांच्या आधारे गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यास मदत होते.

Raj Thackeray : राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर

Exit mobile version