पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेने हादरली मुंबई; गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना बीएमडब्ल्यूने चिरडले, एकाच मृत्यू तर एक गंभीर

पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेने हादरली मुंबई; गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना बीएमडब्ल्यूने चिरडले, एकाच मृत्यू तर एक गंभीर

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेने मुंबई हादरली आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटेच्या सुमारास मुलुंडमध्ये एका आलिशान कारने दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळाचे बॅनर रस्त्यावर लावत असतानाच कारने जोरदार धडक दिल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गणेशोत्सवानिमित्त आज देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. पण, मुलुंडमध्ये घडलेल्या या घटनेने शोककळा पासरली आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवाशीच हि घटना घडल्यामुळे मुंबई पुरती हादरली आहे. या घटनेत गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून त्याना उडवल्यानंतर चालक तिथून पसार झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये पहाटे चारच्या सुमारास एका बीएमडब्ल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि चालक पसार झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीरआहे. मुलुंड पूर्व मधील गव्हाणपाडा येथे हि घटना घडली आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रसाद पाटील आणि प्रीतम थोरात हे दोघे कार्यकर्ते पहाटे चारच्या दरम्यान रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते. मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ ते बॅनर लावत होते. यादरम्यान अचानक एक भरधाव बीएमडब्ल्यू कार कॅम्पस हॉटेल येथून मुलुंड पूर्व ते पश्चिमेकड़े जाणाऱ्या उड्डाणपुलाकडे जात होती. यावेळी कारचालकाने शिडीसह त्या दोघाना जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबलादेखील नाही. तो भरधाव वेगाने मुलुंड पश्चिमच्या दिशेने पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. कारचा आणि चालकाचा शोध सुरु असल्याचे सांगितले.

नेमकं घडलं काय?

मुलुंड पूर्व येथील गव्हाणपाडा येथे ‘मुलुंडच्या राजा’ मंडळाच्या कार्यकर्त्यांना एका बीएमडब्ल्यू कारने जोरात धडक दिली असून त्यात एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवाचे बॅनर लावणाऱ्या प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील यांना बीएमडब्ल्यू कारच्या चालकाने उडवले असून तो अद्याप फरार आहे. पहाटे चारच्या सुमारास हि घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version