spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; ऑडी कारचालकाने दिली दोन रिक्षांना धडक

राज्यात पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरण (Pune Porsche Car Accident) आणि मुंबईतील वरळी येथी हिट अँड रन प्रकरणावरून (Worli Hit and Run Cse) राज्यातील वातावरण आधीच गरम असताना आता मुंबईमधील मुलुंड येथेही हिट अँड रनची (Mulund Hit and Run Case)  घटना घडली आहे. मुलुंड येथे आज सकाळी (सोमवार, २२ जुलै) एका ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिल्याने तीन जण जखमी झाले आहेत. त्यामुळे, पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरणामुळे मुंबई हादरली आहे.

आज सकाळी मुलुंड पश्चिम येथील मुलुंड पोलीस स्टेशनसमो एक ऑडी कार एका रिक्षाला जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती कि कार धडकलेली रिक्षा दुसऱ्या एका रिक्षाला जाऊन आदळली. अशाप्रकारे दोन रिक्षा एक्सीडेंट मध्ये आल्या. या अपघातात दोन्ही रिक्षांचे ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

अपघातानंतर आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी शोध घेतला असता त्याला कांजूरमार्ग येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव विजय दत्तात्रय गोरे असे असून त्याचे वय ४३ वर्ष आहे. ताब्यात घेतल्यानंतर मुलुंड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता आणि मोटर वेहिकल ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल केला आहे एक्सीडेंट नंतर फरार झालेल्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याची मेडिकल चाचणी करण्यात आली. त्यानंतर ब्लड सॅम्पल सी एन एल सी सी साठी पाठवण्यात आले आहे. मेडिकल चाचणी दरम्यान त्याच्या तोंडाला देखील दारूचा वास येत असल्याने डॉक्टरांनी सांगितले त्यादरम्यान देखील सेक्शन त्याच्यात ऍड करण्यात आले आहे. पुढील तपास मुलुंड पोलीस स्टेशन करत आहे.

वरळी येथील हिट अँड रन केस आणि पुणे येथील कल्याणीनगर येथील पोर्शे कर अपघातानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकारांनंतर वाहतूक पोलीस कामाला लागले असून ठिकठिकाणी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Mumbai उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ‘इतक्या’ कोटींची तरतूद – Mangal Prabhat Lodha

Balasaheb Thackeray यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार?: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss