spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई विमानतळ सोने तस्करीचा अड्डा, अकरा महिन्यात तब्बल…

कधी चपलेतून सोन्याच्या बिस्किटची तस्करी, कधी साडीतून नोटांची तस्करी, कधी मास्कमधून सोन्याचं स्मगलिंग (Gold Smuggling) तर कधी बुटात लपवलेलं सोनं.

कधी चपलेतून सोन्याच्या बिस्किटची तस्करी, कधी साडीतून नोटांची तस्करी, कधी मास्कमधून सोन्याचं स्मगलिंग (Gold Smuggling) तर कधी बुटात लपवलेलं सोनं. अशी तस्करी परदेशात नव्हे तर चक्क मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सुरु आहे. सध्या मुंबईचं विमानतळ तस्करीचा मोठा अड्डा बनलंय. आताही मुंबई विमानतळावर सोनं तस्करी करणाऱ्या ६ जणांच्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आलंय. महसूल गुप्तचर संचालनालयानं (Directorate of Revenue Intelligence) मोठ्या स्मगलिंग सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. बुटांमध्ये मेणात हे सोनं लपवण्यात आलं होतं. ७ किलो ४०० ग्रॅम वजनाच्या या परदेशी बनावटीच्या सोन्याची किंमत ४ कोटी ५१ लाख रुपये आहे..

छोट्या पॅकेटमध्ये मेणात सोनं लपवलं जायचं. सोन्याची ही पाकिटं विमानात सीटवरच सोडली जायची. खासगी विमान कंपनीचा स्टाफ ही पाकिटं विमानतळाबाहेर आणायचे. एका तस्करीसाठी स्टाफला ५० हजार रुपये मिळायचे. तस्करीतून हा स्टाफ महिन्याला ४ लाख रुपयांची कमाई करायचा. या टोळीत एका खासगी विमान कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर मुंबईच्या काळबादेवीतल्या कुरिअर सर्व्हिस सेंटरच्या दोघांचा समावेश आहे. या टोळीची मोडस ऑपरेंडी अधिकाऱ्यांनाही नवीनच होती. मुंबई विमानतळ गेल्या काही वर्षांपासून सोनं तस्करीचा अड्डाच बनलाय. देशात मुंबई विमानतळाचा सोने तस्करीत पहिला क्रमांक लागलोय.

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने ११ महिन्यांमध्ये ३६० कोटींचं ६०४ किलो तस्करी केलेलं सोनं जप्त केलंय ऑक्टोबर २०२२ पासून मुंबईत सोन्याची तस्करी करताना २० पेक्षा जास्त परदेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय तस्करी करण्यात विमान कर्मचाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलाय. तस्करीतून मिळणाऱ्या झटपट पैशांच्या मोहापायी ते तस्करांच्या जाळ्यात अलगद सापडतायत. गेल्या तीन वर्षात ५८ विमान कर्मचाऱ्यांना तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलीय. भारतात परदेशातून पुरुषांना २० ग्रॅम तर महिलांना ४० ग्रॅम सोनं आणण्याची परवानगी आहे. ज्वेलर्सच्या माहितीनुसार भारतात एकूण ७२० टन सोनं दरवर्षी येतं. ३८० टन कायदेशीररित्या तर ३४० टन सोनं तस्करीमार्गे येत असल्याचा दावा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते भारतात मौल्यवान धातूंची तस्करी १६० टनांवर पोहोचली आहे. आयात शुल्क ७.५ वरुन १२.५ टक्के केल्याने तस्करी वाढल्याचा दावा वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने केलाय.

हे ही वाचा: 

कोपर रेल्वेस्थानकावरील नवीन तिकीट घर अजूनही बंदच…

‘जेलर’च्या यशानंतर रजनीकांत यांच्या एका नवीन चित्रपटाची घोषणा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss