MUMBAI: मोठा घातपात होणार असल्याचा दावा, पुन्हा एकदा धमकीचा कॉल

जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते. यावेळी २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. तपास केल्यानंतर अवघ्या काही तासांत या आरोपीला अटक करण्यात आली होती.

MUMBAI: मोठा घातपात होणार असल्याचा दावा, पुन्हा एकदा धमकीचा कॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याना आलेल्या धमकीच्या कॉलनंतर आता मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर (Terrorist Attack) असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईत मोठा घातपात होणार असल्याची माहिती फोनवरुन देण्यात आली आहे. दक्षिण मुंबई (South Bombay) पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा आलेल्या धमकीच्या फोनवर एका व्यक्तीने माहिती दिली की, ‘मुंबईत मोठा कांड होणार आहे’. जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. २१ नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्कात असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा आहे. एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचा शोएब नावाच्या कॉलरने दावा केला आहे. समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांच्या हवाली केले आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. यापूर्वी मंत्रालय उडवून देण्याचा फोन आला होता.आतापर्यंत आलेल्या धमकीच्या फोनपैकी ९० टक्के फेक कॉल होते. त्याआधीही मुंबई कंट्रोल रुमला (Mumbai Control Room) अनेक वेळा दहशतवादी हल्ल्याची धमकी (Terrorist Attack) देण्यात आली होती. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते. यावेळी २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. तपास केल्यानंतर अवघ्या काही तासांत या आरोपीला अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरच मनोज जरांगेंच्या भाषेचा दर्जा घसरतोय, सकल मराठ्यांची चिंता

पंकज त्रिपाठीच्या कडक सिंह चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version