Mumbai Coldest Temperature, मुंबईत हुडहुडी वाढली, पारा १३. ८ अंशावर घसरला

मुंबईत बघा हा घसरला आहे त्यामुळे मुंबईकरांना हुडहुडीचा सामना हा करावा लागत आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Mumbai Coldest Temperature, मुंबईत हुडहुडी वाढली, पारा १३. ८ अंशावर घसरला

मुंबईत बघा हा घसरला आहे त्यामुळे मुंबईकरांना हुडहुडीचा सामना हा करावा लागत आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD), मुंबईत आज सकाळी पारा १३. ८ अंशापर्यंत घसरला आहे. तसेच यंदाच्या हिवाळ्यात मुंबईमध्ये १५ ते १७ जानेवारी च्या दरम्यान थंडीची लाट ही येणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा ५अंश कमी आहे. २५ डिसेंबर २०२२ रोजी आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान होते. म्हणजेच या हिवाळ्यातील तापमानाचा पारा हा १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेलेला होता. त्यानंतर आज १३.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील ३ दिवस संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका हा पुढील तीन दिवस वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात सरासरी तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. पुणे, नाशिकसह धुळे, जळगावमध्ये पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज देखील आहे.

तसेच मुंबईचा पारा हा घसरला तर आहेच परंतु मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईकर ज्या हवेमध्ये असतात ती मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही वाईट स्थिती गेली आहे. मुंबईतील तापमानात घट झाल्यानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. १३.८ अंशांवर मुंबईतील किमान तापमान गेल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थिती झाली आहे.

हे ही वाचा:

सॅमचे मागे लागण्याचे कारण आले समोर, दृश्यम २ अभिनेत्री इशिता दत्ताचे बोल्ड फोटो होत आहेत व्हायरल

आमच्या विकासकामांवर शिंदे- फडणवीड फोटो लावतात, आदित्य ठाकरेंचा आरोप

ठाकरे गटाच्या पाठिंब्यानंतर शुभांगी पाटील नॉट रिचेबल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version