Mumbai Covid Scam, संजीव जैयस्वालांच्या अडचणीत भर, ईडीच्या छापेमारीत आढळली इतक्या कोटींची रक्कम

संजीव जैयस्वाल यांच्या घरी ईडीने छापेमारी टाकली होती. आयएसएस अधिकारी संजीव जैयस्वाल यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहे.

Mumbai Covid Scam, संजीव जैयस्वालांच्या अडचणीत भर, ईडीच्या छापेमारीत आढळली इतक्या कोटींची रक्कम

संजीव जैयस्वाल यांच्या घरी ईडीने छापेमारी टाकली होती. आयएसएस अधिकारी संजीव जैयस्वाल यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहे. ईडीने त्यांच्या राहत्या घरी टाकलेल्या छापेमारीत ईडी अधिकाऱ्यांना रोख रकमा आणि मालमत्ता सापडल्या आहेत. आढळून आलेल्या या रोख रकमा व मालमत्ता ही संजीव जैयस्वाल आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित असल्याचे समजत आहे. माहितीनुसार यामुळे आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने बुधवारी संजीव जैयस्वाल यांच्या सोबत आणखी १५ हुन अधिक ठिकाणी छापेमारी केली. कथित कोविड सेंटर घोटाळण्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे.

माहितीनुसार संजीव यांच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीत ईडी अधिकाऱ्यांना अनेक रोख रकमा आणि मालमत्ता या संदर्भातील काही महत्वाची कागदपत्रे आढळून आली आहे. आयएएस अधिकारी संजीव जैयस्वाल आणि त्यांच्या पत्नीकडे मुंबईमधील मध आयलँड येथील अर्धा एकर भूखंड तसेच ३४ कोटी रुपयांचे बरेच फ्लॅटस असून अशी साधारण २४ मालमत्ता आहे. त्याचबरोबर १५ कोटींच्या एफडी आहेत. म्हणूनच आता एवढी रक्कम एवढी मालमत्ता एका आयएएस अधिकाऱ्याकडे आली कुठून असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ईडी अधिकाऱ्यांकडून याचा तपास सुरु आहे. असे मिळालेल्या माहितीनुसार समजत आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्यासंबंधीत संजीव जैयस्वाल यांच्या निवासस्थानी ईडी करून छापेमारी करण्यात आली. त्यांना गुरुवारी चौकशीसाठी देखील बोलविण्यात आले होते. मात्र कोणत्यातरी महत्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे संजीव जैयस्वाल उपस्थित राहू शकले नाही. ईडीकडून २१ जूनला विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. ही छापेमारी कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली असून ६८.६५ लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली. अवघ्या महाराष्ट्रात 50 हून अधिक मालमत्ता अंदाजे बाजार मूल्य १५० कोटींहून अधिक उघड करणारी कागदपत्रं, 15 कोटींच्या एफडी असलेली कागदपत्रं, २.४६ कोटी रुपयांचे दागिने, मोबाईल फोन आणि लॅपटॉप इत्यादी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.

माहितीनुसार संजीव जैयस्वाल हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या टेंडंर प्रक्रियेवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि ज्या समितीने लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिलं त्या समितीचे संजीव जैयस्वाल हे भाग होते. नियमानुसार ज्या कंपनीला हे टेंडर द्यायचे होते त्या कंपनीचा आधीच अनुभव लक्षात घेऊन आणि पात्रतेचा विचार करून हे कंत्राट देणं अनिवार्य होत. मात्र तपासात असे लक्षात आले की टेंडर दिलेल्या कंपनीला फारसा अनुभव नव्हता तसेच त्या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळ व लागणारे महत्वाचे साहित्य देखील उपलब्ध नव्हते. मात्र तरीही या कंपनीला कंत्राट दिल गेलं. म्ह्णून संजीव जैयस्वाल यांनी या कंपनीला टेंडर का दिल याबाबत ईडीकडून चौकशी होत आहे.

हे ही वाचा:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा

मुख्यमंत्री झाले शेतकरी! पत्नीसह केली फळांची लागवड…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version