MUMBAI: CSMT च्या पुनर्विकासाचे काम सुरू, वाहनतळाला प्राधान्य

MUMBAI: CSMT च्या पुनर्विकासाचे काम सुरू, वाहनतळाला प्राधान्य

ट्रेनने प्रवास करायचा म्हटला आणि त्यात स्वत:चे एखादे वाहन असेल तर ते वाहन योग्य ठिकाणी ठेऊन निश्चिंतपणे ट्रेनच्या प्रवासाला जाता येईल, अशी एखादी सोयीची जागा असली पाहिजे. रेल्वे स्थानकांच्या बाहेर कमी जागा असल्याने वाहने उभे करणे सोयीचे ठरत नाही. म्हणूनच, ही गोष्ट लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना वाहनतळाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वे (CENTRAL RAILWAY) वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ TERMINUS) च्या पुनर्विकासाचे काम सुरू असून प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटीवर (CSMT) सतराशे वाहन क्षमतेचे बहुउद्देश्य वाहनतळ उभारण्यात येणार आहे.

विमानतळावरील प्रवाशांना मिळणारी सुविधा सीएसएमटीवरील रेल्वे प्रवाशांना सुद्धा मिळणार आहे. मध्य रेल्वे (CENTRAL RAILWAY) वरील सीएसएमटी (CSMT) हे सर्वाधिक रहदारीच्या स्थानकांपैकी एक स्थानक आहे. प्रवाशांची वाढती रहदारी सुरळीत व्हावी, या दृष्टीने प्रवाशांना नवनवीन सुविधा मिळाव्या, यासाठी सीएसएमटी (CSMT) च्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. सीएसएमटी (CSMT) चा ऐतिहासिक वारसा जपून सर्व कामे करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे रेल लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (RAIL LAND DEVELOPMENT AUTHORITY) यांच्याकडून करण्यात येणार आहे. या बांधकामाचे कंत्राट मे. अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी २४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असणार आहे. हे पुनर्विकासाचे (REDEVELOPMENT) काम पुढील तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा रेल्वेचा संकल्प आहे.

सीएसएमटी (CSMT) वरून रोज अंदाजे अकरा लाख प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवाशांना वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी ७५ सरकते जिने शंभर उदवाहने उपलब्ध करण्यात येणार आहेत. विमानतळाप्रमाणे सीएसएमटी (CSMT) वर १०० स्वयंचलित रस्ते ट्रॉव्हलेटर उभारण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पेरु खात असाल ,तर जाणुन घ्या पेरु खाण्याचे फायदे

EDUCATION: आता BIOLOGY विषय न घेता DOCTOR होता येणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version