Thursday, July 4, 2024

Latest Posts

Mumbai Graduate Constituency : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान, सकाळ पासून शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे मोठं मोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळाली. कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येणार याकडे दिग्गजांचे लक्ष आणि त्यांची प्रतिष्ठा पणला लागली आहे.

अनेक दिवसांपासून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या (Teachers And Graduates Election) निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष होतं. २६ जून रोजी विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक आणि पदवीधर या चार मतदारसंघासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज दिनांक १ जुलै लागणार असून आज सकाळी ८ वाजल्यापासून नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई, कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंगघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली.

लोकसभेप्रमाणेच या ही निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मुंबई पदवीधर मध्ये शिवसेनाा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (ShivsenaUBT )आमदार अनिल परब (Anil Parab) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांच्या विरोधात भाजपचे किरण शेलार(BJP Kiran Shelar ) उभे असल्याने भाजप विरुद्ध ठाकरेंची सेना अशी लढत रंगली. तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे(Niranjan davkhare) आणि कॉंग्रेस रमेश किर (Ramesh Kir )असा सामना पार पडला.त्याचबरोबर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर (J.M.Abhankar)हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या सेनेचे किशोर दराडे (Kishor Darade) यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संदिप गुळवे(Sandip Gulve), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) गटाचे महेंद्र भावसार(Mahendra bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek kolhe) अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली.मात्र आज या सर्वांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. अनेक दिवसांपासून नाशिक मतदारसंघ हा चर्चेचा विषय होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी किशोर दराडे (Kishor Darade) यांच्यासाठी प्रचार दौरा देखील केला होता. त्यांच्या या दौऱ्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सकाळ पासून शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे मोठं मोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळाली. कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येणार याकडे दिग्गजांचे लक्ष आणि त्यांची प्रतिष्ठा पणला लागली आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss