‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

दहशतवाद्यांकडून (Terrirst Attack) मुंबईला (Mumbai News) धोका असल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Terrirst Attack Alert in Mumbai : दहशतवाद्यांकडून (Terrirst Attack) मुंबईला (Mumbai News) धोका असल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिस ॲक्शन मोडवर आले असून काल दिवसभर मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी झडती घेण्यात आली. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असून गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला दहशतवादी लक्ष करणार असल्याचं इनपुट सेंट्रल एजन्सी कडून मुंबई पोलिसांना मिळालं होतं. केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली. तसेतच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. धमकीचे निनावी कॉल सुरु असतानाच विशेष अलर्ट आल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबईत काल दिवसभर पोलिसांकडून ठिकठिकाणी झाडझडती घेण्यात आली. विविध भागांत कसून तपासणी करण्यात आली. तसेच धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे.


शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात मॉकड्रिल केलं. या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हे मॉक ड्रील करत कसून तपासणी करण्यात आली. क्रॉफर्ड मार्केट परिसर म्हणजे, मुंबईतील अत्यंत वर्दळीचा भाग. या भागात दोन प्रमुख धार्मिक स्थळे देखील आहेत.” अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉक ड्रिल का केलं जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. विधानसभा निवडणूकांची अवघ्या काही दिवसांतच घोषणा होईल. महिना-दीड महिन्यांच्या अंतरावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दंगली किंवा गालबोट लागेल, असं काही होऊ नये यासाठी मुंबई पोलीस खबरदारी घेत आगेत. त्यातच आता दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलीस अधिक अलर्ट झाले असून ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version