spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Local Megablock, Sunday ला Funday करायचा विचार करताय? तर ही बातमी नक्की वाचा…

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे.

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला उद्या दिनांक १७ जून (रविवार) रोजी लोकल ट्रेनने प्रवास करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर उद्या तुम्हाला कुठे फिरायला जायचे असेल तर त्याच नियोजन हे आजच करा कारण रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेमार्फत प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की उद्या बाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावे. तर हा मेगाब्लॉक देखभालीच्या आणि दुरुस्तीच्या कामांसाठी घेण्यात घेणार आहे.

हार्बर मार्गावरही उद्या मेगाब्लॉक –

  • पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
  • सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ वाजेपर्यंत या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • तर पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ०९.४५ ते दुपारी ०३.१२ वाजेपर्यंत सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत.
  • तसेच ट्रान्सहार्बर मार्गाबाबत बोलायचे झाले तर पनवेल ते ठाणे या अप ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.०२ ते दुपारी ०३.५३ वाजेपर्यंत लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत.
  • ठाणे ते पनवेल या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे.

मध्य मार्गावरील मेगाब्लॉक –

  • मध्ये रेल्वेच्या ठाणे – कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ०३.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत डाउन जलद सेवा ही ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.
  • तर यादरम्यान या लोकल नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर देखील थांबतील.
  • तर कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरुन सुटणाऱ्या लोकल या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
  • मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर या लोकल थांबवण्यात येतील.
  • त्यानंतर मुलुंड येथून ही वाहतूक अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.
  • तर या मार्गावरही दहा मिनिटे उशीराने लोकल धावतील.

Latest Posts

Don't Miss