Mumbai Local Megablock : लोकलने प्रवास करताय? तर घ्या जाणून ‘मेगाब्लॉक’ बद्दल

मुंबईकरांनो, (Mumbai) आज रेल्वेप्रवास (Railway) करणार असाल तर, मुंबई आणि ठाणेकरांसाठी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आजपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Megablock : लोकलने प्रवास करताय? तर घ्या जाणून ‘मेगाब्लॉक’ बद्दल

मुंबईकरांनो, (Mumbai) आज रेल्वेप्रवास (Railway) करणार असाल तर, मुंबई आणि ठाणेकरांसाठी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आजपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम (Carnac Bridge)सुरु करण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातील कोपरी ब्रिजच्या कामानिमित्त हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना कोपरी ब्रिजजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण ७ गर्डर टाकण्यात येणार आहे. १९ आणि २० नोव्हेंबरला रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सात तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोपरी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री म्हणजेच काल रात्री ११ वाजल्यापासून हा मेगाब्लॉक सुरू झाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपनगरीय गाड्या भायखळा ते ठाणे दरम्यान धावणार आहेत. रेल्वेनं प्रवाशांना इतर मार्गांवरुन प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई लोकल व्यतिरिक्त, लांब मार्गावरील वाहतूक देखील या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे.

तसेच मुंबई विभागात पुलाच्या कामासाठी २७ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबईला येणाऱ्या रेल्वे रद्द केल्या आहेत. यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वेचा देखील समावेश आहे. तर काही रेल्वे मुंबईला न जाता पुण्यापर्यंत धावणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ तास सुरु राहणारे हेल्पडेस्क देखील सुरु केले आहे. प्रवाशांना आवश्यकता भासली तर पुणे स्थानकावरून एसटी गाड्या सोडण्याचे देखील नियोजन झाले आहे.

हे ही वाचा :

सभा सुरू असताना अचानक नितीन गडकरी यांना चक्कर आली; कार्यक्रम थांबवला

Mantralay : मंत्रालयात ‘स्पायडरमॅन’ पद्धतीने तरुणाचे आंदोलन; न्यायासाठी प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

या’ व्हिडिओमुळे ‘आदिपुरुष’ चित्रपटातील VFX आर्टिस्ट होत आहेत ट्रॉल; पहा काय आहे या व्हिडिओमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version