spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Local असुरक्षित?, महिलांच्या डब्यात २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

संपूर्ण मुंबईला हादरून देणारी ए बातमी नुकतीच समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संपूर्ण मुंबईला हादरून देणारी ए बातमी नुकतीच समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ ही उडाली आहे. रोज रात्री अपरात्री लोकल ट्रेन मधून महिला या प्रवास करत असतात. परंतु आता या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. आणि या गोष्टीमुळे सर्वत्र खळबळ ही उडाली आहे.

चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी वाजता ही भीषण घटना घडली. प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती, तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी नवी मुंबईतील बेलापूर येथे एका परीक्षेला बसणार होती. बुधवारी सकाळी ही मुलगी सीएसएमटी येथे हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये चढली. ट्रेनने हालचाल सुरू करताच, त्या वेळी रिकाम्या असलेल्या महिलांच्या डब्यात एक माणूस घुसला, असे अधिकाऱ्याने सांगितले. “सकाळी ७:२६ च्या सुमारास सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने अलार्म वाजवल्यावर तो मस्जिद स्टेशनवर (CSMT नंतरचे स्थानक) खाली उतरला आणि तो पळून गेला,” असे अधिकाऱ्याने सांगितले. मुलीने जीआरपीकडे जाऊन तक्रार दाखल केली, त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले

“जीआरपी, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांच्या पथकांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी मशीद स्थानकाच्या आत आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर त्याची ओळख पटली आणि दुपारी चारच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. “अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमान्वये बलात्कारासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास सुरू आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

अजित पवारांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

लाच घेणारे तीन पोलीस हवालदार निलंबित!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss