Mumbai Mega Block, मुंबईकरांनो उद्या लोकलने प्रवास करायचा असेल तर आजच करा नियोजन

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच.

Mumbai Mega Block, मुंबईकरांनो उद्या लोकलने प्रवास करायचा असेल तर आजच करा नियोजन

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला उद्यादि २२ जानेवारी (रविवार) रोजी लोकल ट्रेनने प्रवास करायचा असेल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर उदयाला तुम्हाला कुठे फिरायला जायचे असेल तर त्याच नियोजन हे आजच करा कारण रविवारी हार्बर (Harbor) आणि ट्रान्सहार्बर मार्गावर (Trans Harbor) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मात्र तुम्हाला जर मध्य रेल्वेने प्रवास करायचा असेल तर, मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही. तसेच याबाबत मध्य रेल्वेने सांगितले आहे की, उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे तसेच याबाबी प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी १०. ३५ ते दुपारी ३. ३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच या दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत.

ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक –

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते दुपारी ४. १० पर्यंत असणार आहे. त्याच बरोबर ठाणे येथून सकाळी १०. ३५ ते सायंकाळी ४. ०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल इथून सकाळी १०. २५ ते सायंकाळी ४. ०९ वाजेपर्यंत ठाणे करता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११. ४० ते सायंकाळी ४. ४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते सायंकाळी ४. १० पर्यंत

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक –

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी १०. ४८ ते सायंकाळी ४. ४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९. ५३ ते दुपारी ३. २० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०. ४५ ते सायंकाळी ५. १३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे ही वाचा:

जैन मंदिराच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दाखल

राशी भविष्य २१ जानेवारी २०२३ आपण हाती घेतलेलं कोणतेही काम पूर्णत्वास..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version