spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई मेट्रो 2A आणि 7 झाले उद्घाटन, आजपासून प्रवासासाठी खुल्या होणाऱ्या मेट्रोची सविस्तर माहिती घ्या जाणून

काल दि. १९ जानेवारी २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ४० हजार कोटी किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे.

Mumbai Metro : काल दि. १९ जानेवारी २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ४० हजार कोटी किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. तसेच यासोबत त्यांनी मुंबई मेट्रो रेल्वे लाईन 2A आणि 7 याचे देखील उद्घाटन केले आहे. यादरम्यान उद्घाटनानंतर नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंद देखील लुटला. या दोन मेट्रो लाईन बनवण्यासाठी सुमारे १२,६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. तर आज पासून या दोन्ही मेट्रो लाईन सर्वसामान्यांसाठी झाले आहेत.

तुम्हाला जर मेट्रोच्या या ३५ किमी मार्गावरून प्रवास कार्यही असेल तर या साठी तुम्हाला सुमारे ६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मेट्रो ७ च्या १६.५ किलोमीटरच्या मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे ३० रुपये खर्च करावे लागतील. तर मेट्रो-२A च्या १८.६ किलोमीटरच्या मार्गासाठी कमाल भाडे ३० रुपये असेल. हे दोन्ही मेट्रो कॉरिडॉर घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-3 कॉरिडॉरलाही जोडण्यात आले आहेत. तसेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या दोन्ही मार्गिकांच्या तिकीट दरांची घोषणा केली आहे. या मार्गिकांसाठी तिकीट दर १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत असणार आहे. तिकीट दर हे स्थानकांमधील अंतरावर आधारित आहेत.

० ते ३ किमी अंतरासाठी १० रुपये
३ ते १२ किमी अंतरासाठी २० रुपये
१२ ते १८ किमी अंतरासाठी ३० रुपये
१८ ते २४किमी अंतरासाठी ४० रुपये
२४ ते ३० किमी अंतरासाठी ५० रुपये

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, किती आहे मेट्रो स्टेशन? (मुंबई मेट्रो मार्ग 7)

या मार्गावर तुमचा अंधेरी पूर्वेकडील गुंदवली स्टेशन ते दहिसर पूर्व असा प्रवास सुरू होईल.
गुंदवली
मोगरा
जोगेश्वरी पूर्व
गोरेगाव पूर्व
आरे
दिंडोशी
कुरार
आकुर्ली
पोईसर
मागाठाणे
देवीपाड
राष्ट्रीय उद्यान
दहिसर पूर्व हे स्थानक असेल.

अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम, किती आहे मेट्रो स्टेशन? (मुंबई मेट्रो मार्ग 2 अ)

या मार्गावरील तुमचा प्रवास डीएन नगर मेट्रो स्टेशनपासून सुरू होईल.
लोअर ओशिवरा
ओशिवरा
गोरेगाव पश्चिम
पहाडी गोरेगाव
लोअर मालाड
मालाड पश्चिम
वलणई
डहाणूकरवाडी
कांदिवली पश्चिम
पहाडी एकसर
बोरिवली पश्चिम
मंडपेश्वर आयसी कॉलनी कांदरपाडा.

हे ही वाचा:

संजय राऊतांनी केली मोठी घोषणा, ठाकरे गट जम्मूत लढवणार विधानसभेच्या निवडणुका

धनुष्यबाण कुणाचा? आज होणार पुन्हा सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss