spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, उद्या शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट

उद्या दि २६ जानेवारी रोजी मुंबई, दिल्लीसह संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष हा असणार आहे. अनेक ठिकाणी विविध विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उद्या दि २६ जानेवारी रोजी मुंबई, दिल्लीसह संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष हा असणार आहे. अनेक ठिकाणी विविध विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यातही प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी देखील सावधगिरी बाळगली आहे. तर मुंबईतील शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मोठी परेड होत असते. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. उद्या होणाऱ्या या परेडची तयारी आज सकाळपासूनच शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात चालू आहे. यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच या परिसरात कसून चौकशी केली जात आहे. तसेच खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तसेच शिवाजीपार्क या परिसरात मुंबईच्या महापौरांसह पालकमंत्री आणि इतर मंत्री तसेच आमदारही उपस्थित असतात. त्यानिमित्ताने दरवर्षी पोलिसांच्या कवायतीही होत असतात. मात्र, यंदा शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी पार्कात उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तसेच यंदाच्या वर्षी शिवाजी पार्कात १७ चित्ररथाचे पथसंचलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या खात्यांची माहिती पटवून देणारे हे सर्व चित्ररथ आहेत.

हे ही वाचा:

Republic Day 2023 Tiranga Dhokla , यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त घरातल्या घरात बनवा तिरंगा ढोकळा

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट झाला लीक, तेही HD प्रिंटमध्ये

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील रस्ते राहणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss