मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये हल्ल्याच्या धमकीच्या फोनचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत मुंबईत गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब (Bomb Blast) ठेवल्याची धमकी अनेकदा देण्यात आली. आता चक्क मुंबई पोलिसांनाच (Mumbai Police) धमकीचा फोन (Threatening phone call) आल्याची घटना समोर आली आहे. काल मुंबईतील बोरिवली पोलीस ठाण्यात एक फोन आला आणि मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार असल्याचा माहिती फोन वरून देण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तब्बल तासाभरात आरोपीला अटक केली. तर संबंधित आरोपीच्या विरोधात मुंबईतील वाकोला, खेरवाडी, बीकेसी आणि बोरीवली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोरीवली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला १३ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात व्यंजकतीचा फोन आला. आणि त्याने मुंबईत दहशदवादी हल्ला होणार असल्याचे पोलिसांना सांगितलं. हा पोलिसांना फोन संध्याकाळी आला होता. त्या अज्ञात व्यक्तीने हल्ल्याची माहिती देताना पोलिसांना सांगितलं की “हल्ला करणाऱ्या व्यक्तीने बोरीवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा पकडली आहे. त्या रिक्षात अगोदरच दोघेजण बसले होते. मुंबईवर हल्ला करण्याची त्यांची चर्चा सुरु होती. या तिघांनी ती रिक्षा गोविंदनगर बोरीवली पश्चिम येथे सोडली”. असे त्या अज्ञात व्यक्तीने बोरिवली पोलिसांना सांगितले. बोरिवली पोलिसांच्या बोरीवली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित माहिती पुरवली. यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या रिक्षाचा शोध घेण्याचे निर्देश देले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे निर्देश येताच पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एटीसी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने गोविंद नगर परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तपास सुरु असतानाच त्या कॉलरने पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करुन कळवले की, रिक्षामध्ये बसून हल्ला करण्याची चर्चा करत होते. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे कॉलरला एक्सर डोंगरी परिसरातील घरातून छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा फोनची तपासणी केली. धमकीचे फोन हे त्या व्यक्तीनेच केले असल्याचेपोलिसांच्या लक्षात येताच त्वरित त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

हे ही वाचा : 

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली, पण न्यायालयाने निकाल ठेवला राखून

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version