spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MUMBAI: PRAKASH AMBEDKAR यांचे RAHUL GANDHI यांना निमंत्रण

मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या (VANCHIT BAHUJAN AGHADI) संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले असून या पत्रात प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR) यांनी १९९८ मध्ये भारिप बहुजन महासंघाने काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, २५ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क (CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ PARK)येथे होणाऱ्या संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण राहुल गांधी यांना पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी (RAHUL GANDHI) यांना पत्र लिहून हे निमंत्रण पाठविले असून या पत्रात त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचे काँग्रेसचे कौतुक केले आहे. 

सध्या देशात आरएसएस-भाजप (RSS-BJP), ज्यांचे अस्तित्व केवळ घटनात्मक मूल्य आणि आदर्श नष्ट करण्यावर आधारित आहे, यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, मी वंचित बहुजन आघाडी या माझ्या पक्षाच्यावतीने तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे (SANVIDHAN SANMAN MAHASABHA) निमंत्रण देतो. तुमच्या संबोधनादरम्यान तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दल तुमची दृष्टी त्याबाबतची भूमिका मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळेल, असे आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

२५ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क (CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ PARK)येथे होणाऱ्या संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण राहुल गांधी यांना पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी (RAHUL GANDHI) यांना पत्र लिहून हे निमंत्रण पाठविले असून या पत्रात त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचे काँग्रेसचे कौतुक केले आहे. 

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरच मनोज जरांगेंच्या भाषेचा दर्जा घसरतोय, सकल मराठ्यांची चिंता

पंकज त्रिपाठीच्या कडक सिंह चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss