Mumbai Rain Update : मुंबईत रात्रभर पावसाचा धुमाकूळ, पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे…, जाणून घ्या सध्या स्थिती काय?

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून दमदार पाऊस कोसळत आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत रात्रभर पावसाचा धुमाकूळ, पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे…, जाणून घ्या सध्या स्थिती काय?

Mumbai Rain News : मुंबईत पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून दमदार पाऊस कोसळत आहे. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. मुंबईत एक तास जरी मुसळधार पाऊस कोसळला, तरी लगेच आपल्याला परिणाम दिसून येतो. आजही तेच चित्र सध्या स्थितीला दिसत आहे. तासाभराच्या पावसाने सुद्धा मुंबईची तुंबई होऊन जाते. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास मुंबईत काही ठिकाणी मसुळधार ते अति मसुळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात काल वर्तवण्यात आली होती.

लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. पण मुंबई मध्ये थोडा जरी पाऊस झाला तर याचा सर्व परिणाम हा लोकल सेवेवर होतो. दररोज लाखो लोक मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेने प्रवास करतात. मागच्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत. सकाळी कामावर निघण्याच्यावेळी पावसाचा जोर वाढतो, त्यामुळे कार्यालय गाठायला विलंब होतो. मुंबईत कर्जत, कसाराच नाही, तर पुण्यावरुनही रोज नोकरीसाठी येणारे लोक आहेत.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 सेल्सिअस आणि 25 सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. तसेच मुंबईत पुढील ३- ४ तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं सखल भागात पाणी साचत आहे. सकाळी साडेपाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा:

Health is Wealth : आयुर्वेदातील ‘हे’ पदार्थ दुधात मिसळल्यास; आजारांनवर होतो परिणाम !

राजकीय पक्षांनी Reservation बाबत आपली भूमिका लेखी कळवावी, CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version