Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या

मुंबई आणि पावसाचे एक वेगळेच नाते आहे. पाऊस आला की मुंबई तुंबायला फारसा वेळ लागत नाही. त्यातच आता मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या

मुंबई आणि पावसाचे एक वेगळेच नाते आहे. पाऊस आला की मुंबई तुंबायला फारसा वेळ लागत नाही. त्यातच आता मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे आता वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांच्या कामामुळे ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी (Traffic congestion) झाल्याचं पाहायला मिळत आहे.

रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी रिक्षाचालक आणि सामान्य नागरिक स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आलेला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. सकाळपासून सुरु असलेल्या या पावसामुळे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) परिसरात पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे. मुंबईसह उपनगरात आज जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मुंबईच्या उपनगरमध्ये पावसाने धुमशान मांडला आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या पावसाच्या जोरामुळे अनेक भागी वाहतूक कोंडी (Traffic congestion) होताना दिसत आहे. संपूर्ण उपनगराप्रमाणेच ठाण्यातही मुसळदार पावसाळा सुरुवात झाली आहे. मुंबईतील पश्चिम दुमार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic congestion) झालेली पाहायला मिळत आहे. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांब रांगा पश्चिम दुमार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीचा (Traffic congestion) मुंबईकरांना सामना करावा लागत आहे.

मागील तीन तासात मुंबईत पडलेल्या पावसाची आकडेवारी –

ठाणे – ५०.०४ मिमी
कुलाबा – ५४ मिमी
दिंडोशी – ३९ मिमी
कासारवडवली – ४४ मिमी
डोंबिवली पश्चिम – ३५ मिमी
डोंबिवली पूर्व – ३१ मिमी
मुंब्रा – ४८मिमी
ऐरोली – ४१मिमी
मुंबई विमानतळ – ३८ मिमी

हे ही वाचा:

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version