spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दादरच्या शिवाजीपार्क पोलीस ठाण्याला मिळणार नवी वास्तू ?

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीपार्क हा परिसर राजधानी मुंबईतील प्रतिष्ठित भाग म्हणून ओळखला जातो. शिवसैनिकांचे शिवसेना भवन, स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्मृतीस्थळ , बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, चैत्यभूमी , स्वातंत्रवीर सावरकर स्मारक अश्या अनेक ऐतिहासिक गोष्टी शिवाजी पार्क परिसरात आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीपार्क हा परिसर राजधानी मुंबईतील प्रतिष्ठित भाग म्हणून ओळखला जातो. शिवसैनिकांचे शिवसेना भवन, स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मृतीस्थळ, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, चैत्यभूमी , स्वातंत्रवीर सावरकर स्मारक अश्या अनेक ऐतिहासिक गोष्टी शिवाजीपार्क परिसरात आहेत. अनेक बडे नेते, कलाकार, संगीतकार, पत्रकार आणि प्रतिष्ठित मंडळी या परिसरात वास्तव्यास आहेत. अनेक कारणांनी संवेदनक्षम असलेल्या या प्रतिष्ठित भागातील कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या शिवाजी पोलीस ठाण्याची अपुऱ्या जागेमुळे गैरसोय होत आहे.

१९९३ साली शिवाजी पार्क पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. तेव्हा मंडप घालून शिवाजी पार्क मैदानात पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. त्यानंतर म्हाडाने बांधलेल्या राम मारूती रोडवरील राम निवास या पाच मजल्याच्या इमारती मधील पहिला ते चौथा असे चार मजले पोलीस ठाण्यासाठी म्हाडाकडून ३६ लाख रूपयांना खरेदी करण्यात आले. या इमारतीत ४५३० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा पोलीस ठाण्यासाठी वापरात आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात २२० पोलीस अधिकारी , कर्मचारी कार्यरत आहेत. याबाबत परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील म्हणाले, सध्याची जागा आम्हांला खूपच कमी पडतेय. आम्ही नव्या मोठ्या जागेच्या शोधात आहोत. प्रयत्नांना कसं आणि कधी यश मिळते ते पहायचं.’

पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षक, तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावरील अधिकाऱ्यांना बसायला स्वतंत्र दालन असण्याची गरज आहे. तसेच गुन्हे प्रकटीकरण,तडीपार पथक, पासपोर्ट विभाग, दहशतवाद विरोधी पथक, रेकॅीर्ड विभाग, सीसीटिव्ही विभाग, विभागीय कारकून, प्रभारी अंमलदार, सीसीटीएनएस विभाग, समन्स वॅारंट स्टाफ, मुद्देमाल कक्ष, या विभागांसाठी सध्या पुरेशी कामासाठी जागा नाही. पोलीसांनी जप्त केलेल्या वाहनांचा परिसरातील नागरिकांनाही खूप त्रास होत असतो. त्यामुळे या भागात दुचाकी पार्क करणे हेही एक मोठे दिव्यच आहे.

बालमोहन जवळील लक्ष्मी सदन मध्ये राहणारे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले, शिवाजीपार्क हा सुशिक्षित, सुसंसकृत लोकांचा परिसर आहे. मुंबई पोलीसांची इथली कामगिरी चांगलीच आहे. पण कामाचा स्तर उंचावण्यासाठी संवेदनक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समाजातील सगळ्या घटकांबद्दल जाण असणारे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्क पोलीसांच्या बाबतीत सकारात्मक विचार करतील. या पोलीस ठाण्याला चांगली मोठी जागा म्हणजे दादरकरांनाच न्याय असं म्हणता येईल, असंही जठार म्हणाले.

 

 याच परिसरात सेना भवनच्या डावीकडे पद्माभाई ठक्कर मार्गावर मुंबई महापालिकेने शाळेसाठी चार मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत शाळा भरत नाही. या इमारतीतील काही खोल्यांचा पालिकेकडून वापर होतोय. तर आसपास मोकळी जागाही आहे. त्यामुळे ही इमारत पोलीस ठाण्यासाठी मिळावी असा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. ही महापालिकेची रिकामी जागा पोलीस ठाण्यास मिळाल्यास पोलीसांसाठी आणि नागरिकांच्याही फायद्याचे ठरू शकते. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. नगरविकास मंत्रालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने शिवाजीपार्कवासियांना प्रश्न मार्गी लागण्याची आशा वाटतेय.

हे ही वाचा : 

BBC कार्यालयारील आयकर विभागाच्या धाडीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयावर… Valentine Day 2023, मुलींनो तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचं ? ड्रीम गर्ल ने साधला पठाणशी संवाद, लवकरच ड्रीम गर्ल २ येणार भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss