spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई हादरली!, महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला

धावते शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. परंतु याच धावत्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या लालबाग परिसरातून सर्वाना हादरवणारी एक गोष्ट समोर आली आहे.

धावते शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. परंतु याच धावत्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या लालबाग परिसरातून सर्वाना हादरवणारी एक गोष्ट समोर आली आहे. मुंबईतील लालबाग परिसरात प्लास्टिकच्या पिशवीतून ५३ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला आहे. महिलेच्या मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे करण्यात आले. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, महिलेच्या २२ वर्षीय मुलीला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

 डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, पीडितेचा भाऊ आणि पुतण्या यांनी यापूर्वी काळाचौकी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, ही महिला राहत असलेल्या अपार्टमेंटमधील काही रहिवाशांनी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कुजलेल्या मृतदेहासारखी दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. या माहितीनंतर अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर शोधमोहीम राबवली असता एका प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला.वीणा प्रकाश असे या महिलेचे नाव असून तिच्या शरीराचे हात-पाय कापण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची पुष्टी करताना डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, लालबाग परिसरात एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ५३ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, मृत महिलेच्या २२ वर्षीय मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबतच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

Ambabai, पुरातत्त्व खात्याकडून अंबाबाईच्या मूर्तीची छेडछाड? पुजाऱ्यांचा वकिलांचा गंभीर आरोप

दिया मिर्झाच्या वेदना ओसरल्या, ‘3 महिने मुलगा होता आयसीयूमध्ये’

धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला १३५ कोटी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss