spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai: पुन्हा एकदा धमकी, १ मिलियन डॉलर द्या नाहीतर बॉम्बस्फोट करु

मुंबई पोलिसांना धमकीचे फोन येणार प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. नुकताच मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा एक ई-मेल आला आहे.  यावेळी ई-मेल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आला नसून मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका ईमेलवर आला आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल उडवून देऊ, असा धमकी देणारा मेल यावेळी करण्यात आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर गुरुवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला असून, यामुळे एअरपोर्ट प्रशासनाची काळजी वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने हा स्फोट  टाळण्यासाठी ४८ तासांच्या आत एक दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे. सहारा पोलिसांकडून या प्रकरणाबाबत एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने quaidacasrol@gmail.com या ईमेल आयडीद्वारे धमकीचा ई-मेल पाठवला आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

तुमच्या विमानतळासाठी हा अंतिम इशारा आहे

एका अज्ञात व्यक्तीने गुरुवारी सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्स मध्ये हा ई-मेल पाठवला होता. आरोपीने धमकीच्या ईमेल मध्ये लिहिलं आहे की, ‘तुमच्या विमानतळासाठी हा अंतिम इशारा आहे, असे झाले नाही तर आम्ही विमानतळाच्या टर्मिनल दोनवर ४८ तासांच्या आत बॉम्बस्फोट करू. आम्हाला बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवा, नाहीतर २४ तासानंतर तुम्हाला दुसरा इशारा मिळेल.’ या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात धमकावणे आणि खंडणी मागितल्या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३८५ आणि ५०५ (१) B नुसार नोंदवला आहे. तसेच याबाबतचा पुढील तपासही सुरू आहे.

मुंबईत मोठा कांड होणार आहे

जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. २१ नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला होता. फोनवरील व्यक्तीने मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला होता. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता.

मंत्रालय उडवून देऊ

मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. यापूर्वी मंत्रालय उडवून देण्याचा फोन आला होता.आतापर्यंत आलेल्या धमकीच्या फोनपैकी ९० टक्के फेक कॉल होते. त्याआधीही मुंबई कंट्रोल रुमला (Mumbai Control Room) अनेक वेळा दहशतवादी हल्ल्याची धमकी (Terrorist Attack) देण्यात आली होती. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते. यावेळी २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. तपास केल्यानंतर अवघ्या काही तासांत या आरोपीला अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन

महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss