spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai University, विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला पाच वर्षांपासून राखीव, राज्यपालांच्या आदेशालाही धूडकावले

प्रवीण गांधी महाविद्यालयात मॅनेजमेंट स्टडीजचे (Management Study) शिक्षण घेणारा दक्ष शहा (Daksha Shah) या विद्यार्थ्याचा मागील पाच वर्षापासूनचा निकाल मुंबई विद्यापीठाने अजून दिला नाही. काही वैदकीय कारणांमुळे दक्षला त्याच्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी आवश्यक तासिका भरणे शक्य झाले नाही त्यामुळे त्याच्या विद्यापीठाने त्याला पाचव्या सत्र परीक्षेस बसण्यास नकार दिला होता.

प्रवीण गांधी महाविद्यालयात मॅनेजमेंट स्टडीजचे (Management Study) शिक्षण घेणारा दक्ष शहा (Daksh Shah) या विद्यार्थ्याचा मागील पाच वर्षापासूनचा निकाल मुंबई विद्यापीठाने अजून दिला नाही. काही वैदकीय कारणांमुळे दक्षला त्याच्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी आवश्यक तासिका भरणे शक्य झाले नाही त्यामुळे त्याच्या विद्यापीठाने त्याला पाचव्या सत्र परीक्षेस बसण्यास नकार दिला होता. विद्यापीठाच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी दक्ष मुंबई उच्च न्यायालयात गेला आणि त्याने यासंदर्भात याचिका दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याला परीक्षा देण्यास परवानगी दिली. त्यांनतर त्याने पाचव्या सत्राची परीक्षा दिली, मग सहाव्या सत्राची परीक्षा दिली. दोन्ही सत्रातही तो पास झाला मात्र व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयामुळे त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला.

या संदर्भात त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्र लिहिले आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayri) यांनी या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवास फोन करून निकाल देण्याचे आदेश दिले. मात्र या फोन नंतरही विद्यापीठाने दक्षचा निकाल दिला नाही. यासंदर्भात विद्यापीठाने स्पष्टीकरण देताना म्हटले की, परीक्षेला बसण्याआधी उपस्थित राहणे अशी अट असते आणि ही अट पूर्ण करणे गरजेचे असते त्यामुळे व्यवस्थापन परिषदेने निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भात विद्यापीठाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे तसेच महाविद्यालयास हि कळवण्यात आले. दक्षचा निकाल पाच वर्षांपासून राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

मुंबई विद्यापीठ शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ(Agricultural University)तसेच महाविद्यालयीन(College) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ (Maharashtra State University) आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दोन फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे,यामुळे कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांना स्थगिती दिली आहे. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक ऑनलाईन स्वरूपात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss