मुंबईकरांनो घराबाहेर पडत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक तपासा

मुंबई लोकल म्हणजेच मुंबई मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच.

मुंबईकरांनो घराबाहेर पडत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक तपासा

Mumbai Local Train Mega Block : मुंबई लोकल म्हणजेच मुंबई मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. तर मुंबईकरांनो तुम्हाला जर घराबाहेर पडायचं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.आज दि. १५ जानेवारी रोजी रविवारी देखभालीच्या कामांसाठी मुंबई लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Local Train Mega Block) घेण्यात येणार आहे. आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या (Mumbai Local Mega Block) मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर घराबाहेर पडत असाल तर आधी वेळेपत्रक पूर्ण तपासा आणि मगच घराबाहेर पडा. लोकलच्या रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभालीच्या काम अश्या अनेक कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या संपूर्ण मेगाब्लॉकमुळे मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११. ०५ ते सायंकाळी ४. ०५ पर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून)

या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०. ३३ ते दुपारी ३४९ वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३. ५३ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०. ०१ ते दुपारी ३. २० वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

 

तर सेंट्रल मार्गावर माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११. ०५ ते दुपारी ३. ५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०. २५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील.

 

हे ही वाचा:

हे कायद्याचं राज्य आहे, कोयत्याच नाही!, भाजपने केली जोरदार पोस्टरबाजी

सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version