spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांनो, आज फिरायला जायचा विचार करताय? आज मध्य, हार्बर मार्गावर आहे Megablock

आज मुंबई लोकलच्या मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गांवर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला उद्या दिनांक १७ जून (रविवार) रोजी लोकल ट्रेनने प्रवास करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज मुंबई लोकलच्या मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गांवर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाण्याच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक
  • वाशी ते कुर्ला दरम्यान सकाळी ११.१० वाजल्यापासून दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक
  • तर पश्चिम रेल्वेकडूनही (Western Railway) माहीम ते सांताक्रूझ दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
  • विद्याविहार-ठाणे पाचवी आणि सहावी लाईन सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत
  • ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटं उशिरा पोहोचतील.

  • कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

Latest Posts

Don't Miss