spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईची हवा झाली दिल्लीपेक्षाही खराब, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक गेला ३०० पार

मुंबईकरांनो काळजी घ्या ! कारण आता मुंबई ही प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहे. आज सलग सहावा दिवस आहे परंतु हवा गुणवत्ता निर्देशांक यात दिवसेंदिवस वाढ ही होतच चालली आहे.

मुंबईकरांनो काळजी घ्या ! कारण आता मुंबई ही प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहे. आज सलग सहावा दिवस आहे परंतु हवा गुणवत्ता निर्देशांक यात दिवसेंदिवस वाढ ही होतच चालली आहे. प्रदूषणात हि दिवसेंदिवस वाढच होत आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही खराब स्थितीत आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा ३०० पार गेला आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३१९ नोंदवण्यात आलेला आहे. हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत असल्याने वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे दक्षिण आणि मध्य हवा ही वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे.

दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालली आहे. त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) ३१९ वर गेला आहे. म्हणजे अतिधोकादायक श्रेणीत मुंबईची नोंद झाली आहे. तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक ३०८ वर आहे. परंतु अजूनही राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

चेंबूर आणि नवी मुंबईतील हवा गुणवत्ता अतिधोकादायक स्थितीत

नवी मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक ३६२
अंधेरी ३२७
चेंबूर ३५२
बीकेसी ३२५
बोरीवली २१५
वरळी २००
माझगाव ३३१
मालाड ३१९
कुलाबा ३२३
भांडूप २८३ वर गेला आहे.

हे ही वाचा:

देवळाली गावात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने केला गावात गोळीबार, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण

ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या मनात…

मुंबई मेट्रो 2A आणि 7 झाले उद्घाटन, आजपासून प्रवासासाठी खुल्या होणाऱ्या मेट्रोची सविस्तर माहिती घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss