spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे पालिका प्रशासन सतर्क, रुग्ण संख्येत वाढ

राज्यात सध्या कोरोना व्हारस पुन्हा एकदा डोके वर काढत आहे.

राज्यात सध्या कोरोना व्हारस पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona New Variant) सगळ्यांची चिंता वाढली आहे. कोविडच्या (Covid) नव्या JN1 व्हेरीअंटविषयी मुंबई महापालिका (BMC) आरोग्य विभागाकडून (Health Department) माहिती देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सूचना दिल्या आहेत. दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात माहिती देताना सांगितले, कोरोनाचा जे एन १ नावाचा नवा व्हेरीयंट सापडला आहे. मात्र, हा व्हेरीअंट सौम्य स्वरुपाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका. मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांच्या उपचारा संदर्भात सर्व उपाययोजन आणि तयारी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले, मुंबई उपाययोजना आणि सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णालयातील खाटा, औषधे यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार पुढील तयारी सुरु आहे. टेस्टींग करुन नव्या व्हेरीयंटचं संक्रमण तपासण्यात येणार आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यात येणार आहेत. नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असे आव्हान त्यांनी सगळ्यांना केले आहे. देशभरात नव्या व्हेरियंटचे रूगन काही प्रमाणात वाढत आहेत. हा कोरोना सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरू नका, मात्र काळजी घ्या, असे पालिका प्रशासनाने केले आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

देशासह राज्यातील कोरोना रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नव्या JN1 व्हेरियंटच्या रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईतही १९ कोरोना रुग्ण आढळले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातील एकही रुग्ण नवीन JN1 व्हेरियंटचा नाही. सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत.केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात रुग्ण संख्या वाढल्यामुळे केंद्राकडून बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये केंद्राकडून राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

गुगलला आणखीन एक मोठा धक्का, कोर्टाने ठोठावला ७० कोटी रुपयांचा दंड

Dunki ची कथा नेमकी काय आहे? Shah Rukh Khan ने केला मोठा खुलासा! म्हणाला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss