Dharavi Redevelopment Project: मुंबईतील सर्व जमिनींचे अधिकारच अदानीला देण्याचा BJP सरकारचा प्रयत्न: Nana Patole

Dharavi Redevelopment Project: मुंबईतील सर्व जमिनींचे अधिकारच अदानीला देण्याचा BJP सरकारचा प्रयत्न: Nana Patole

Dharavi Redevelopment Project: “धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात व महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र व महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकू देणार नाही,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ठणकावून सांगितले.

अदानीच्या प्रश्नावर पत्रकांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अदानीच्या धारावी प्रकल्पाबद्दल काँग्रेस पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही या मुद्द्यावर भूमिका जाहीर केलेली आहे परंतु भाजपा सरकार मात्र मुंबईतील महत्वाचे व मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे टेंडर दुबईच्या एका कंपनीला मिळाले होते पण नंतर ते रद्द करुन अदानीला देण्यात आले. महायुती सरकार हे गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा भाजपा प्रणित शिंदे सरकारचा प्रयत्न काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही. राज्यातील जनतेत महायुती सरकारच्या या गुजरात धार्जीणेपणाबद्दल प्रचंड विरोध आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली आहे. १० वर्षापासून महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या भगिनींना १५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाच्या योजनांची नावे बदलून त्या राबवल्या जात आहेत. संजय गांधी निराधार योजना, साजीव गांधी जनआरोग्य योजना यासरख्या विविध योजना काँग्रेस सरकारने आणल्या व जनतेला त्याचा लाभ दिला असे नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

Ladki Bahin Yojana: विरोधकांकडून पहिल्यापासूनच योजनेला विरोध, जे टीका करतात तेच महिलांचे फॉर्म भरतायेत: Aditi Tatkare

Ghatkopar Hoarding Case: Kaisar Khalid यांच्यावर IPC 304A अंतर्गत कारवाई व्हावी: Kirit Somaiya

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version