Nana Patole लढवणार MCA ची निवडणूक, ट्विट करत दिली माहिती

Nana Patole लढवणार MCA ची निवडणूक, ट्विट करत दिली माहिती

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आगामी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) (MCA) अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझगाव क्रिकेट क्लबकडून निवडणूक लढणार आहेत. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याची माहिती दिली. यावेळी त्यांनी माझगाव क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

नाना पटोले यांनी ट्विट करत सांगितले, “मला मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी माझगाव क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. यापूर्वी मा. मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख, कै. गोपीनाथ मुंडे, मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांनी माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. तीच संधी आज मला मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी माझगाव क्रिकेट क्लब आणि समस्त क्रिकेट प्रेमींना आश्वासन देतो की, मी क्रिकेटसोबतच सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुण खेळाडूंच्या भल्यासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे ते म्हणाले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज नेते राहिलेले आहेत. शरद पवार, आशिष शेलार, मनोहर जोशी, इत्यादींसारखे महाराष्ट्रातील अनेक बडे नेते अध्यक्ष म्हणून यापूर्वी निवडून आले आहेत. आता यांच्या सोबत अजून नाना पटोले यांचेदेखील नाव पुढे आले आहे.

याअगोदर टाइम महाराष्ट्र ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शाह आलम यांची विशेष मुलखात घेतली. यावेळी त्यांनी सांगितले, “या पूर्वी मी विलासराव देशमुख यांना आणलं होत. माझा यामागे एकच ध्येय आहे की असोसिएशनमध्ये क्रिकेटर आणि लोकांचा फायदा झाला पाहिजे. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी विलासराव देशमुख यांनी मोठ्ये काम केले हे आपण सर्वांनीच पहिले आहे. त्यांच्या निधनांनंतर मुंबई क्रिकेट असोशिएशन अक्षरशः पोरके झाले होते. तससच त्याकाळात मी गोपिनाथ मुंडे यांनाही आणलं.कारण सर्वसामान्यांचे फायदे व्हावे यासाठी मी त्यांना आणलं. MCA ला याचा काहीतरी फायदा व्हावा म्हणून या राजकीय नेत्यांना अध्यक्ष म्हणूंन आणले होते. आता पर्यंत सर्व मोठे नेते अध्यक्ष बनले आहेत. त्यात आतापर्यंत माझ्या पक्षाचा नेता नव्हता त्यामुळे नाना पटोले यांच्यासारखा दिग्गज लोकांच्या कामाचा नेता बनतील अशी माझी खात्री आहे. त्यामुळेच त्यांनां अध्यक्ष पदासाठी मी घेऊन आलो आहे.”

हे ही वाचा:

Devendra Fadnavis यांनी केली मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

अजित पवार यांची विधानसभेत मोठी, लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version