Narendra Modi In Mumbai, कोणी कल्पाना केली नसेल भारतात अशा प्रकारची गाडी धावेल, देवेंद्र फडणवीस

Narendra Modi In Mumbai, कोणी कल्पाना केली नसेल भारतात अशा प्रकारची गाडी धावेल, देवेंद्र फडणवीस

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचे कवतुक करत स्वागत केले आहे. पुढे फडणवीस म्हणाले की “कोणी कल्पना नव्हती केली होती की भारतात अशा प्रकारची ट्रेन सुरु होईल, एवढे सुंदर एका ट्रेनचे वातावरण असेल, एवढी फास्ट कोणती ट्रेन जात असेल. अशी ट्रेन आज मुंबई पासून ते साई नागरी शिर्डी पर्यंत साईबाबानं चा आशीर्वाद आपल्याला मिळेल यासाठी, आणि दुसरी ट्रेन मुंबई ते सोलापूर पर्यंत आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी,महाराष्ट्राची इष्ट देवता पांडुरंग विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्याकरिता, आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही टर्न महाराष्ट्राच्या भाविकांसाठी आणि प्रवाश्यांसाठी एक वरदान असेल” असे म्हणत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात सांगितलं की, “वंदे भारत एक्स्प्रेस ही स्वत:मध्ये एक चमत्कार आहे. अशा रेल्वेची कुणी कल्पनाही केली नव्हती. आता भारतात ही रेल्वे धावेल. यातील पहिली रेल्वे मुंबई ते साईनगरी शिर्डीपर्यंत साईबाबांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी धावेल. दुसरी रेल्वे मुंबई ते सोलापूर अशी सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनमुळे आई तुळजा भवानी, सिद्धेश्वर, महाराष्ट्राची देवता विठ्ठल आणि स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद घेता येईल. ही रेल्वे महाराष्ट्रातील भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी मैलाचा दगड ठरेल.”” असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे.

उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात अर्थसंकल्पाचा उल्लेख करत सांगितलं की “या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी महाराष्ट्राला १३ हजार कोटी रुपये दिले. आम्ही कधी याबाबत ऐकलं नव्हतं आणि विचारही केला नव्हता. महाराष्ट्रातील १२४ रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तर एक आदर्श रेल्वे स्थानकाच्या रुपात विकसित होत आहे. भारतीय रेल्वेच्या आधुनिक इतिहासात एकच नाव लिहिलं जाईल, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असेल…” अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे.

हे ही वाचा : 

MPSC ने नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर करावा, अतुल लोंढे

Narendra Modi In Mumbai, ‘मोदींच मिशन मुंबई’, जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version