spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Narendr Modi In Mumbai, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई, अंधेरीतील वाहतुकीत बदल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहेत. नरेंद्र मोदी उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे दुपारी ठीक २. ४५ मिनिटांनी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेक बदल हे करण्यात आले आहेत. जर उद्या तुम्ही दक्षिण मुंबई आणि अंधेरी परिसरात जाणार असाल तर हा वाहतुकीतील बदल जाणून घ्या.

उद्या पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे वःतून व्यवस्थेत बदल हा करण्यात आला आहे. या संदर्भात मुंबई वाहतूक पोलिसांनी आज ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ट्रॅफिक पोलिसांनी आज एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर उद्या दुपारी २ ते ४ या वेळेत थोडासा परिणाम होईल. याशिवाय, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गाने होणारी वाहतूक दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत किंचित बदलली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असाल?

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी दुपारी २. १० मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील.पुढे ते मुंबई विमानतळावरून हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती येणार आहेत. दुपारी २.४५ वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील.
  • प्लॅटफॉर्म १८ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ मिनिटांसाठी चालत वंदे भारतच्या ट्रेनकडे जाणार आहेत. पुढे ७ मिनिट हे वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत गप्पा मारतील.
  • नंतर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. हा सर्व कार्यक्रम साधारणता ३ मिनिटांचा असेल. पुढे त्यांना १ मिनिटांचं यासंदर्भात प्रेसेंटेशन मोदींना दिलं जाईल.
  • पुढे ते प्लॅटफॉर्म १८ वरून वाहनाच्या दिशेने २ मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरतीदाखल होतील. सीएसएसटी रेल्वे स्थानकात हा साधारणता १५ मिनिटांचा हा कार्यक्रम असेल.
  • पुन्हा ३.५५ ला सीएसटी वरून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील. पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईविमानतळाच्या दिशेने रवाना होतील. दुपारी ४. २० मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील. मुंबई विमानतळ ते मरोळ कारने जाणार आहेत.
  • मरोळ येथील कार्यक्रमाला ४. ३० वाजता पोहचतील. ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन होईल. ५. ५० वाजता मरोळहून कारने मुंबई विमानतळावर जाणार आहेत. ६ वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.

हे ही वाचा : 

Narendr Modi In Mumbai , उद्या पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, घ्या जाणून दौऱ्याचं शेड्यूल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss