Narendr Modi In Mumbai, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई, अंधेरीतील वाहतुकीत बदल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहेत.

Narendr Modi In Mumbai, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई, अंधेरीतील वाहतुकीत बदल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहेत. नरेंद्र मोदी उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे दुपारी ठीक २. ४५ मिनिटांनी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेक बदल हे करण्यात आले आहेत. जर उद्या तुम्ही दक्षिण मुंबई आणि अंधेरी परिसरात जाणार असाल तर हा वाहतुकीतील बदल जाणून घ्या.

उद्या पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे वःतून व्यवस्थेत बदल हा करण्यात आला आहे. या संदर्भात मुंबई वाहतूक पोलिसांनी आज ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ट्रॅफिक पोलिसांनी आज एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर उद्या दुपारी २ ते ४ या वेळेत थोडासा परिणाम होईल. याशिवाय, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गाने होणारी वाहतूक दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत किंचित बदलली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असाल?

हे ही वाचा : 

Narendr Modi In Mumbai , उद्या पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, घ्या जाणून दौऱ्याचं शेड्यूल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version