Narendr Modi In Mumbai , उद्या पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, घ्या जाणून दौऱ्याचं शेड्यूल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहेत.

Narendr Modi In Mumbai , उद्या पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, घ्या जाणून दौऱ्याचं शेड्यूल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबई अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहेत. नरेंद्र मोदी उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे दुपारी ठीक २. ४५ मिनिटांनी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर उद्या मोदीच काय शेड्यूल असणार आहे ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असाल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मरोळमध्ये आगमनाआधी मुंबई महानगरपालिकाकडून आणि मुंबई पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मरोळ परिसर हा मोठा झोपडपट्टीच्या परिसर असल्यामुळे पोलिसांसमोर मोदींच्या दौरासाठी मोठा आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे १००० जवान मरोळ येथील दौरासाठी तैनात करण्यात आले आहे. यात मुंबई पोलिसांचे ५ डीसीपी, २०० अधिकारी, ८०० अंमलदार मोदी यांच्या बंदोबस्त साठी तैनात असणार आहेत.

मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत या २ ट्रेनला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील ९ वी वंदे भारत ट्रेन असेल. या नव्या जागतिक दर्जाच्या ट्रेनमुळे मुंबई आणि सोलापूर दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा प्रवासही सुकर होईल. तर मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन ही १० वी वंदे भारत ट्रेन असेल. यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनी सिंगणापूर या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या संपर्कातही सुधारणा होईल.

मुंबईतील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पंतप्रधान सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) आणि कुरार अंडरपास समर्पित करतील. कुर्ला ते वाकोला आणि एमटीएनएल जंक्शन, बीकेसी ते कुर्ला येथील एलबीएस फ्लायओव्हरपर्यंत नव्याने बांधण्यात आलेला एलिव्हेटेड कॉरिडॉर शहरातील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी वाढवेल. तसेच मोदी मरोळ, मुंबई येथे अल्जामिया-तुस-सैफीयाह (द सैफी अकादमी) च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील.

हे ही वाचा : 

मोदी-अदानी भाई भाई, संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणा दरम्यान विरोधकांची घोषणाबाजी

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर ‘सामना’च्या अग्रलेखाला काँग्रेसकडून प्रत्युत्तर

गौतम अदानींच्या अडचणीत होणार वाढ, हिंडेनबर्ग अहवालावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version