देशाच्या गृहमंत्र्यांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याच काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हल्लबोल

भाजपच्या पुण्यातील कार्यकर्त्या बैठकीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली वक्तव्य देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही.

देशाच्या गृहमंत्र्यांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याच काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हल्लबोल

भाजपच्या पुण्यातील कार्यकर्त्या बैठकीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली वक्तव्य देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. अशा वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Chandra Pawar Party) वतीने निषेध करण्यात येत आहे, असे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Chief Spokesperson Mahesh Check) यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला गेला असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. मुळात फेक नरेटिव्ह भाजपच्या नेत्यांकडूनच केला जातो असा प्रति दावा तपासे यांनी केला. पवार साहेब यांनी भ्रष्टाचार वाढवला असं अमित शहा यांनी म्हणणे हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला भाजप पुरस्कृत एक नवा फेक नरेटिव्ह आहे असा टोला तपासे यांनी लगावला. शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप भाजपने राजकीय फायद्यासाठी नेहमीच केले. सामान्य शेतकरी माणसाचं कष्ट कमी करण्यासाठी पवार यांनी कृषी मंत्री असताना केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याची आठवण तपासे यांनी अमित शहा यांना करून दिली.

पुढे महेश तपासे म्हणाले की, राज्यातील आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने यापूर्वीच करण्यात आली होती. आरक्षणाची मर्यादा ५०% पेक्षा जास्त वाढवण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र केंद्रातील भाजप सरकार आरक्षणाच्या मुद्दा गांभीर्याने घेत नाही आहे व कायदेशीर रित्या आरक्षणाची मर्यादा वाढवीत नाही असे देखील महेश तपासे म्हणाले. महेश तपासे म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्या बैठकीमध्ये राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे ठोकून काढा अशा भाषेचा उपयोग केला त्याचा नेमका अर्थ काय समजायचा हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही भाजपला वाढलेल्या महागाईचे कारण, वाढलेल्या बेरोजगारीचे कारण, वाढलेल्या भ्रष्टाचाराचे कारण विचारणे हा फेक नरेटीव होऊ शकत नाही. जनतेला भेडसवणाऱ्या ह्या प्रमुख प्रश्नांना फेक नॅरेटिव्ह ठरवणे हे खरंतर भाजपचं अपयश आहे असा टोला महेश तपसे यांनी लगावला. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडून येणार असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version