spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navneet Rana यांच्या घरात चोरी, ‘इतकी’ कॅश झाली लंपास

मुंबईतील खार येथील आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. नोकरानेच ही चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चोरीच्या प्रकरणी नोकर अर्जुन मुखियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा यांच्या घरातून २ लाखांची कॅश लंपास करण्यात आली आहे. पैसे घेऊन तो त्याचे मुळगाव असलेले बिहार येथे पळून गेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा मुंबईत खार येथे फ्लॅट आहे. खार येथील लाव्ही अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर राणा यांच्या मालकीचे घर आहे. या घरात अर्जुन मुखिया हा नोकर म्हणून कार्यरत आहे. मागील दहा महिन्यांपासून अर्जुन याच फ्लॅटवर राहत होता. रवी राणा यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या संदीप सासे यांच्याकडे फ़ेब्रुवारी महिन्यात दोन लाख रुपये दिले होते. हे पैसे त्यांनी कपाटात ठेवले होते. खर्चासाठी काही रक्कम काढण्यासाठी कपाट उघडण्यात आले होते. तेव्हा पाहिले असता, कपाटात दोन लाख रुपये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या संदीप सासे यांच्याकडे संपूर्ण फ्लॅटची जबाबदारी आहे. नोकर असलेला अर्जुन मुखिया हा मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवासी आहे. मार्च महिन्यात तो होळीनिमित्त त्याच्या गावी गेला. त्यानंतर तो परत आला नाही. राणा यांच्या पीएने अर्जुनला बऱ्याचवेळा कॉल केला मात्र त्याने कॉल घेतला नाही. चोरी करून तो त्याच्या बिहारमधील दरभंगा या गावी पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या अटकेसाठी एक टीम तयार करण्यात आली असून ही टीम पुढील तपास करणार आहे.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांचा मुंबईत रोड शो, ‘हे’ मार्ग राहतील बंद

Saif पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार? Kareena – Saif वेगळे होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss