spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा शिंदे – फडणवीस सरकारविरोधात मोर्चा

५० खोके,माजलेत बोके... ५० खोके,एकदम ओके...सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणा-या अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा... आटली की बाटली,

५० खोके,माजलेत बोके… ५० खोके,एकदम ओके…सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणा-या अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा… आटली की बाटली, कचकन फुटली, खोटे गुन्हे दाखल करताना लाज नाही वाटली… या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज सायंकाळी शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा काढला.

आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिलांनी कार्यालय ते मंत्रालयाकडे घोषणा देत कूच केली. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली शिवीगाळ आणि शिंदे सरकार खोटे गुन्हे दाखल करत असल्याने महिलांच्या मनात प्रचंड चीड होती त्यातूनच आज राष्ट्रवादीच्या रणरागिनींनी थेट हल्लाबोल केला.

 राष्ट्रवादीच्या शेकडो रणरागिनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत मंत्रालयाकडे निघाल्याचे समजताच पोलिसांची तारांबळ उडाली आणि मग भेटेल तिथे महिलांना अटक करण्याचा सपाटा लावला. मात्र पोलिसांच्या दंडेलशाहीला न जुमानता मंत्रालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण आणि राज्यातील त्यांच्या सर्व महिला पदाधिकार्‍यांनी केले. याशिवाय मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व पदाधिकारी, कार्यकर्ते हेही उपस्थित होते.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार – 

औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना अब्दुल सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भि** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं. सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

प्रतापगडावर अफझल खान वधाचं होणार स्मारक; पर्यटन मंत्र्यांचा मोठा निर्णय

रोहितच्या हातून कर्णधारपद जाणार, हार्दिक पांड्या होणार भारतीय संघाचा नवा कर्णधार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss