Thursday, July 4, 2024

Latest Posts

Acharya Marathe College : हिजाब बंदी नंतर आता आचार्य कॉलेजमध्ये जिन्स, टी-शर्ट ला बंदी !

कोणताही धार्मिक तेढ निर्माण करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारी कोणताही पोशाख करु नये.नकाब, हिजाब, टॉपी, या सगळ्या गोष्टी कॉमन रुममध्ये जाऊन बदलून कॉलेजच्या कॅम्पस मध्ये फिरु शकतील असे नियम आखण्यात आले आहेत. 

हिजाब(Hijab) बंदी वरुन चेंबूर मधील आचार्य मराठे कॉलेज (Acharya Maratha College of Chembur) सध्या चर्चेत होतं.मागील आठवड्यात कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. या नंतर आता यासंबंधातील नोटीस काढून नवे नियम लागू करण्यात आले आहे. आधीच हिजाब बंदी वरुन विद्यार्थ्यांचा रोष अधिक होता मात्र आता नव्या नियमाने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

या आधी आचार्य- मराठे महाविद्यालयात(Acharya Maratha College of Chembur) हिजाब बंदी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. महाविद्यालयाने घालून दिलेले नियम हे आमच्या धर्माचे उल्लंघन करत आहे. धर्माविरोधात नियम घालून देणे हे चुकीचे आहे. असं विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला होता.

मात्र आता विद्यालयाने जीन्स, टी-शर्ट, जर्सीलाही बंदी घालण्याची नोटीस आचार्य- मराठे विद्यालयातील प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केली आहे. हिजाब बंदी वरुन मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांची याचिका फेटाळल्यानंतर ड्रेस कोर्ड संदर्भात सूचना जाहीर करतील येतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी अशा पद्धतीने वस्त्र परिधान करण्यात कॉलेज परिसरात परवानी नसल्याची माहिती सूचना पत्रात देण्यात आली आहे.

कोणताही धार्मिक तेढ निर्माण करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारी कोणताही पोशाख करु नये.नकाब, हिजाब, टॉपी, या सगळ्या गोष्टी कॉमन रुममध्ये जाऊन बदलून कॉलेजच्या कॅम्पस मध्ये फिरु शकतील असे नियम आखण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

Maharashtra Monsoon Assembly 2024: ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार, Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss