spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Police यांच्याकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, खोके दिन, गद्दार दिन साजरा…

आज दिनांक २० जून रोजी असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वृक्ष हे पूर्ण झाले आहे. आजच्याच दिवशी एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून काढता पाय घेतला आणि त्यामुळे शिंदे गट तयार झाला. शिवसेना पक्षात उभी फूट पडली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच दिनांक २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केला. आज या संपूर्ण घटनेला १ वर्ष पूर्ण झाले आहे. तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज खोके दिन साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. परंतु आज दिनांक २० जून रोजी असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत.

आज एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने आज मुंबई सह राज्यातील अनेक भागामध्ये खोके दिन तसंच गद्दार दिन साजरा केला जात आहे. तर दुरीकडे सोशल मीडिया देखील चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहे कारण ठाकरे गटाच्या तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर तशाप्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस देखील सक्रिय झाले आहेत. म्हणून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख त्यासोबतच माजी नगरसेवकांना आणि काही नेत्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे कुठलाही दिन साजरी करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. हे दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.

याच मुद्याला धरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या संदर्भात संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करत हे पत्र शेअर केले आहे. २० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला रवाना झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी ५० खोके (५०कोटी) रुपये घेतले त्यामुळे दिनांक २० जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला राम राम प्रवेश शिवसेनेत प्रवेश

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss