spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नव्या वर्षात बसणार महागाईचा फटका वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतक्या रुपयांनी महागला सिलेंडर

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. १ जानेवारी २०२३ पासून गॅस सिलिंडर खरेदी करणे महाग झाले आहे. आता नागरिकांना सिलिंडर घेण्यासाठी पूर्वीपेक्षा २५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. आजपासून व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे सिलिंडरचे दर जैसे थेच असणार आहेत. म्हणजेच घरगुती सिलिंडरसाठी या महिन्यात तुम्हाला पूर्वीइतकाच खर्च करावा लागणार आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले २५ रुपयांनी वाढले असल्यामुळे त्याच्या दरात नेमका काय फरक पडलाय ते पाहूया. आता दिल्लीत तुम्हाला १७६९ रुपयांना व्यावसायिक सिलिंडर मिळेल. तर मुंबईत १७२१ रुपये, कोलकात्यात १८७० रुपये आणि चेन्नईमध्ये १९१७ रुपये मोजावे लागतील आहेत.

घरगुती सिलेंडरचे दर आहेत इतके

दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत १०५३ रुपये आहे. याशिवाय, मुंबईत १०५२.२ रुपये, कोलकात्यात १०७९ रुपये, तर चेन्नईमध्ये १०६८.५ रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या ९ महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती १५३.५ रुपयांनी वाढल्या आहेत. १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत शेवटचा बदल ६ जुलै २०२२ रोजी करण्यात आला होता. मार्च महिन्यात ५० रुपये, मे महिन्यात ५० रुपये आणि ३.५० रुपये दोनदा आणि त्यानंतर जुलैमध्ये पुन्हा एकदा ५० रुपये.

काँग्रेसने मारला टोमणा

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रावर ताशेरे ओढत काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून देशातील जनतेला ही नवीन वर्षाची भेट आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 25 रुपयांनी महागला आहे. ही सुरुवात आहे.’

२०१४ पासून गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

२०१४ नंतर गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये४१० रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर आता १,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. भाजप सत्तेत आल्यापासून इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या असून, त्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वयंपाकघरातील बजेटवर मोठा परिणाम झाला आहे.

हे ही वाचा:

कापसाच्या दरात वाढ, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

नवे वर्ष,नवे नियम ! जाणून घ्या काय आहेत बदल आणि त्याने तुमच्या बजेटवर कसा होणार परिणाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss