अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांची ‘ही’ कृती भावली सगळ्यांनाच…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. आज दिनांक १७ जुलै पासून राज्यातील पावसाळी अधिवेशन हे सुरु झाले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांची ‘ही’ कृती भावली सगळ्यांनाच…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. आज दिनांक १७ जुलै पासून राज्यातील पावसाळी अधिवेशन हे सुरु झाले आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन हे मुंबईत तब्बल १५ दिवस सुरू राहणार आहे. हे अधिवेशन १७ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. तर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा चालू आहे.

आज अधिवेशनाला सुरुवात झाली परंतु सगळीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होत आहे. परंतु ही चर्चा का होत आहे तर सॊशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो हा व्हायरल होत आहे. आणि यामध्ये त्यांनी एक कृती केली आहे त्यामुळे ते आणखी जास्त चांगलेच चर्चेत आलेत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत आहे त्यावेळी पाऊस पडत होता. सुरक्षा रक्षकांनी छत्री हातात धरली होती त्यावेळी चालत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पायातले बूट काढून हातात घेतले. बूट हातात घेऊन अनवाणी पायाने देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत पोहचले. बूट पाण्यात भिजू नयेत आणि बुटांची घाण सभागृहात लागू नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचं सध्या सगळीकडे चांगलंच कौतुक होतं आहे.तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी इन्सपायरिंग असा शब्द लिहिला आहे. त्यानंतर त्यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. तसेच संघ संस्कारांचा स्वयंसेवक नेता असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनीही हाच फोटो ट्वीट केला आहे. भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना देवेंद्र फडणवीस यांचा हा साधेपणा भावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे असं म्हणत काही नेटकऱ्यांनीही हा फोटो ट्वीट केला आहे.

आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शोक प्रस्ताव सादर झाल्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीचं कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. विधान परिषदेत अधिवेशनाची सुरुवात होताच नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. तर सभागृहाच्या बाहेरही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांची कृती लक्ष वेधून घेते आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जेव्हा नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच आक्षेप घेतला गेला तेव्हा पॉईंट ऑफर ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं. तसंच विधानसभेतही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाताले मुत्सदी नेते म्हणून ओळखले जातात. अशात आता त्यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होताना दिसते आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात गदारोळ सुरू, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा निषेध

World Emoji Day 2023, जाणून घ्या इमोजीचा शोध कुणी लावला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version