मुंबईतील ओपन डेस्क बससेवा चालूच राहणार

मुंबईमध्ये अनेक लोकही फिरण्यासाठी येत असतात. इथे अनेक पर्यटन स्थळसुद्धा आहेत. त्याचबरोबर या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी एक ओपन डेस्क बस चालवण्यात येत होती परंतु त्या संधर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

मुंबईतील ओपन डेस्क बससेवा चालूच राहणार

मुंबईमध्ये अनेक लोकही फिरण्यासाठी येत असतात. इथे अनेक पर्यटन स्थळसुद्धा आहेत. त्याचबरोबर या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी एक ओपन डेस्क बस चालवण्यात येत होती परंतु त्या संधर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई (Mumbai) मध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, राणीची बाग, गेट वे ऑफ इंडिया यांसारखी अनेक स्थळ आहेत.विदेशी पर्यटक (foreign tourists) मोठ्या प्रमाणावर मुंबई फिरण्यासाठी येत असतात. मुंबईचे आकर्षण हे सगळ्यांनाच आहे. तर आता मुंबईकरणासाठी एक गोड बातमी आहे. ५ ऑक्टोबरपासून ‘ओपन डेक’ बसगाड्या (Open Double Deck Buses) बंद करण्यात येणार होती. पण पर्यटक आणि नागरिक यांची वाढती मागणी पाहता ही बस सेवा चालू ठेवण्यात येणार आहे. मुंबईच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ही बस सेवा खूप महत्वाची आहे. मुंबई दर्शन करण्यासाठी या ओपन डेस्क बस सेवेचा प्रवाशाना विशेष फायदा होतो.

५ ऑक्टोबरपासून मुंबईतील ‘ओपन डेक’ बसगाड्या (Open Double Deck Buses) बंद होणार होत्या . पण पर्यटकांची वाढती मागणी पाहता ही बस सेवा चालू ठेवण्यात येणार आहे. ओपन डेस्क बस गाड्यांचा कार्यकाळ पंधरा वर्षाचा असून तो आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे या बस गाड्या आता मोडीत काढण्यात येणार आहेत. या ओपन डेस्क बस मधून पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो. तसेच प्रवाशाचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नवीन दुमजली ओपन डेक बसगाड्या खरेदीचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुमजली ओपन डेस्क बससेवा सुरु होईपर्यंत ‘मुंबई दर्शन’ बससेवा खंडीत हाऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसगाडया मुंबई दर्शनासाठी तयार करणार आहे. सोमवार ते शुक्रवार यादिवशी तीन वातानुकूलित दुमजली बसगाड्या आणि शनिवार आणि रविवार वातानुकूलित दुमजली गाड्या चालवण्यात येणार आहेत.

मुंबईतील ओपन डेस्क बस गाड्यांचा विशेष फायदा म्हणजे एका दिवसात संपूर्ण मुंबई फिरत येते. यामध्ये मंत्रालय विधानभवन सी. एस एमटी. बीएमसी हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, आरबीआय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, एशियाटीक लायब्ररी जुने कस्टम हाऊस, एनसीपीए मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ इत्यादी सर्व ठिकाण फिरता येतात. बेस्ट सेवेमार्फत ही बस सेवा १९९७ पासून सुरु करण्यात आली आहे.

Exit mobile version