spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Police शहरात रात्रभर ‘ऑपरेशन ऑल आऊट’, मुंबई पोलिस अँक्शन मोडवर

मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट (Operation All Out) अंतर्गत कारवाई केली केली आहे. या कारवाईत पोलिसांनी फरार, वाँटेड, तडीपार आरोपींना पकडले असून एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थ तस्करांवरही कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट (Operation All Out) अंतर्गत कारवाई केली केली आहे. या कारवाईत पोलिसांनी फरार, वाँटेड, तडीपार आरोपींना पकडले असून एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थ तस्करांवरही कारवाई केली आहे. याबरोबरच बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर देखील कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केली. नवीन वर्षाच्या (New Year २०२३) पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत ऑपरेन ऑल आऊटची कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. याबोबरच मोटार वाहन कायद्यान्वये तब्बल २३०० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यातील ६० वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल आऊट ऑपेरेशनमध्ये मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील २९ फरारी आरोपींना अटक केली. अंमली पदार्थ खरेदी आणि विक्री करणाऱ्या संशयितांवर अंमलीपदार्थ विरोधी कायद्याअन्वये १६४ कारवाया करण्यात आल्या. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ३१ जणांवर कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. अवैध दारू विक्री आणि जुगार असा अवैध धंद्यांवर ७३ ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. तसेच इतर अवैध ३८ धंद्यांवर छापे टाकून ५५ आरोपीतांना अटक करण्यात आली.

मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले परंतु, मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने ६४ कारवाया करण्यात आल्या. संशयितरित्या वावरणारे १४८ जणांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत ३५३ फेरीवाल्यांवर (Hawkars) कारवाया करण्यात आल्या. मुंबई शहरात २२३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील १४७१ आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये २७१ आरोपी मिळून आले. त्यांच्यावर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७८ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यामध्ये ८६९० दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली आणि मोटार वाहन कायद्यान्वये २३०० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कलम १८५ मोवाका अन्वये ६० वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ८७२ हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. याबरोबरच ५५५ संवेदनशिल ठिकाणची तपासणी करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी पोलिस ठाणे, नाकाबंदी आणि कोबिंगच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले व ऑल आऊट ऑपेरेशन प्रभावीपणे राबविण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजीच्या रात्री नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त शहरात गर्दी होते. त्या अनुषंगाने मुंबई शहरात काल २९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून आणि आज म्हणजे ३० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपेरेशन राबविण्यात आले होते. मुंबई शहरातील सर्व पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, १३ परिमंडळीय पोलिस उपआयुक्त, पोलिस उपआयुक्त विशेष शाखा आणि सुरक्षा, ४१ विभागीय सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात ऑल आऊट ऑपेरेशनची कार्यवाही केली.

हे ही वाचा:

बिग बॉसला मिळाली थेट (ncsc) ची नोटीस, करावे लागणार का विकासला बाद ?

Eknath Shinde अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांनी हादरवाला, पहा टीकेचे धनी कोण कोण बनले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss