जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन

दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन १९९२ पासून जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन

दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन १९९२ पासून जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून ३ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी, जेणेकरून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी याची मदत होईल. समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. याच पाश्ववभूमीवर वामनराव मुरांजन हायस्कूल मध्ये पूर्वा फॉउंडेशनमधील विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वामनराव मुरांजन हायस्कूल आणि पूर्वा फॉउंडेशनच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिन हा दिवस मोठ्या उत्सहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. मुलांना आणि त्यांच्या पालकांसाठी आज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना टिळक करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे प्रथमतः स्वागत करण्यात आले. त्यासोबत मुलांसाठी जादूचे प्रयोग सादर करण्यात आले होते. अनेक आणि वेगवेगळ्या जादूच्या कला बघून मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आले. तसेच अनेक प्रयोग करताना मुलं देखील स्वतःहून सहभाग घेत होते. हे सर्व प्रयोग चालू असताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांच्या पालकांचे चेहरे देखील खुलले होते. तसेच दिव्यांग मुलांसाठी इतर मुलांनी लेजीम देखील सादर करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. तसेच वामनराव मुरांजन हायस्कूल मध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. आणि जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनचे उदघाटन शुभम शेट्टी याच्या हस्ते करण्यात आले होते.

– डॉ. आनंद प्रधान

आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त डॉ. आनंद प्रधान यांनी दिव्यांग मुलांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, हि जी मुलं आहेत ती कोणी वेगळी नाहीत. ते आपल्यामधीलच आहे. यातील रोज एक विद्यार्थी हा इतर मुलांसोबत वर्गात बसून शिक्षण घेतील. डॉ. आनंद प्रधान यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

२०१३ या सालापासून पूर्वा फॉउंडेशन हि संस्था दिव्यांग मुलासाठी काम करत आहे. हि संस्था मुलुंड येथील वामनराव माध्यमिक या शाळेत दिव्यांग मुलांचे वर्ग घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेमध्ये वय वर्ष ३ पासून ३० वर्षापर्यंतचे विध्यार्थी येतात. सध्या एकूण ३२ मुलं पूर्वा फॉउंडेशन मार्फत प्रशिक्षण घेत आहे. बाबुराव शिरतुरे हे पूर्वा फॉउंडेशनचे संचालक असून ते त्यांच्याकडे शिकत असलेल्या दिव्यांग मुलांसाठी नेहमी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.

बाबुराव शिरतुरे त्यांनी सांगितले कि, ते स्वतः याआधी एक शिपाई कामगार म्हणून होते. त्यांना उच्च शिक्षण घेऊन शिक्षक व्हायचे होते. परंतु इतर शिक्षकासारखे त्यांना शिकायचे न्हवते किंबहुना शिकवायचे देखील न्हवते. म्हणून त्यांनी दिव्यांग मुलांना शिकवता येतील असे शिक्षण घेऊन २०१३ साली पूर्वा फॉउंडेशन हि संस्था दिव्यांग मुलासाठी चालू केली. आज माझ्याकडे ३२ मुलं शिकत आहेत आणि अधून मधून सणाच्या दिवशी आम्ही आमच्या मुलांकडून असे नवं नवीन उपक्रम करून घेतो त्यामुळे त्यांना देखील शिकण्यास मिळते. गेल्या ६ वर्षांपासून मुलुंडमध्ये आम्ही हे वर्ग घेत आहोत. असे बाबुराव शिरतुरे यांनी सांगितले.

हे ही वाचा :

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा

मोठी बातमी ! बंजारा समाजचे नेते अनिल राठोड यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version