Bandstand ला फोटोशूट करणे पडले महागात…

मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.एका चुकीमुळे महिलेने आपला जीव गमावला. सदर घटना मुंबईतल्या बँड स्टॅंड (Bandstand) ठिकाणी घडली आहे.

Bandstand ला फोटोशूट करणे पडले महागात…

पावसाळा आला की अपघतांचा काळ जणू सुरु होतो.पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रात (Sea) जाऊ नका असे आव्हान वारंवार नागरिकांना केले जाते. मात्र अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते पण अनेकदा असे करणे जीवावर बेतते. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) सध्या खूप वेगाने व्हायरल होत आहे. समुद्राला लाटा उसळत असताना एक जोडपे समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट (Photo Shoot) करत बसले होते.तर त्यावेळी त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ काढत होता.या मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.एका चुकीमुळे महिलेने आपला जीव गमावला. सदर घटना मुंबईतल्या बँड स्टॅंड (Bandstand) ठिकाणी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ९ जुलैला एक कुटुंब समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. मुकेश सोनार, पत्नी ज्योती सोनार आणि त्यांची तीन मुले रविवार असल्याने बँड स्टॅंड जवळ फिरण्यासाठी आले होते. यावेळी समुद्र किनारी फोटो कढण्यासाठी जोडपं तेथे असलेल्या खडकावर जाऊन बसले. मुकेश आणि ज्योती समुद्रातील खडकांवर बसून फोटोशूट करत होते. तर त्यांचा मोठा मुलगा मोबाईलमध्ये आपल्या आई-बाबांचे फोटो आणि व्हिडिओ काढत होता. काहीवेळ असाच गेला असता अचानकपणे समुद्राची एक मोठी लाट आली आणि त्या लाटेत पती आणि पत्नीचा तोल गेला आणि पत्नी लाटेबरोबर समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलांनी तीला वाचवण्यासाठी जोरजोरात आक्रोश केला ,पण उसळत्या समुद्रात तिला वाचवणे कोणालाही शक्य झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यादेखत महिला समुद्रात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तर ट्वीटरवर (Twitter) Pramod Jain या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

पती मुकेश यांनी सदर घटनेबाबत बोलताना सांगितले की ,समुद्रात मोठी लाट आल्यानंतर ज्योतीचा तोल गेला, मी तिची साडी पकडत तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे असलेल्या एका माणसाने ज्योतीचा पाय पकडला. पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याच्या हातातून तिचा पाय निसटला आणि ज्योती समुद्राच्या पाण्यात वाहून गेली.आयुष्यतले चांगले क्षण मोबाइलमध्ये टिपत असलेल्या मुलाच्या मोबाइलमध्ये हा दुर्दैवी क्षणही कैद झाला.

हे ही वाचा:

Mumbai Covid Scam, संजीव जैयस्वालांच्या अडचणीत भर, ईडीच्या छापेमारीत आढळली इतक्या कोटींची रक्कम

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

अशोक मामांबद्दल खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version