Thursday, July 4, 2024

Latest Posts

प्रचंड संख्यने जमलेल्या उत्साही क्रिकेट प्रेमी गर्दीचे योग्य नियोजन करा- CM Eknath Shinde

टी-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाँईट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींना कोणताही त्रास होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.

मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाचा विक्ट्री परेड  सुरु आहे. संध्याकाळी पाच वाजता निघणाऱ्या विक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मरीन ड्राईव्ह परिसरात नागरिकांची गर्दी झाली आहे. जवळपास दोन तास ही विक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका खुल्या बसमधून ही विक्ट्री परेड काढण्यात आली आहे. याबाबतची माहिती रोहित शर्माने यांनी त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिली होती. आम्ही तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घेऊ इच्छितो. चला तर मग 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियम येथे विक्ट्री परेडसह हा विजय साजरा करूया. वर्ल्डकप घरी येत आहे. अशी पोस्ट रोहित शर्मा याने केली होती.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss