PM Modi Mumbai Visit, पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, पोलीस बंदोबस्त तैनात

PM Modi Mumbai Visit, पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, पोलीस बंदोबस्त तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला पुन्हा मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. महिनाभरात पंतप्रधानांची ही दुसरी भेट असेल. मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीमध्ये बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया या विद्यापीठाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींचा १० फेब्रुवारी मुंबई दौरा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व (Andheri East) येथील दाऊदी बोहरा समाजाच्या अरबी अकादमीच्या (Arabic Academy) उद्घाटनासाठी मोदी येत आहेत. ते परमपूज्य सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन (Mufaddal Saifuddin) यांच्यासोबत व्यासपीठावर सहभागी होण्याची अपेक्षा आहे. समुदायातील एका अधिकाऱ्याने सांगितले की प्रोटोकॉल औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर औपचारिक घोषणा केली जाईल. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आजपासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी देखील या ठिकाणी तब्बल चार तास पाहणी केली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर, जवळपास तीन दशके शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) सत्ता मिळवून ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला आणखी धक्का देण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. सीएसएमटी साईनगर शिर्डी आणि सोलापूर सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) चालवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी इथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. राज्यांतर्गत वंदे भारत एक्सप्रेस असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल. मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर कॅपिटल दरम्यान पहिली धावणारी ही मुंबईतून चालणारी तिसरी वंदे भारत असेल. मुंबईतून धावणारी ही तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल. मुंबई सेंट्रल-गांधीनगर ही मुंबईतील सुटणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस होती.

हे ही वाचा:

पाकिस्तानातील पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला, १७ ठार, ५० हून अधिक जखमी

मुसळधार बर्फवृष्टीत भारत जोडो यात्रेची सांगता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version