spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Modi Mumbai Roadshow लाखोंच्या गर्दीला अभिवादन करत PM Modi यांचा ताफा चालला पुढे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा रोडशो मुंबईतल्या घाटकोपर परिसरात पार पडत आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या प्रचारासाठी हा रोडशो होत आहे. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल येथून या रोडशोला संध्याकाळी ७.०० वाजता सुरुवात झाली असून घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ या रोडशोचा समारोप होईल. मोदींच्या या रोड शो मुळे मिहीर कोटेचा यांच्यासह महायुतीच्या मुंबईतील इतर उमेदवारांनादेखील मदत होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या रोडशोला लाखोंच्या संख्येने नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित असून रस्त्याच्या दुतर्फ़ा लांबच लांबपर्यंत गर्दी दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक विशेष वाहन तयार करण्यात आले असून ते त्यात स्वार होत रस्त्याच्या दुतर्फ़ा जमलेल्या लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा, मुंबई उत्तर मध्यचे उमेदवार उज्ज्वल निकम, मुंबई उत्तरचे उमेदवार पियुष गोयल हे उपस्थित आहेत.

घाटकोपर भागात गुजराती समाजातील लोक अधिक प्रमाणात राहत असून भाजपचा हक्काचा मतदार समजला जातो. त्याशिवाय घाटकोपर परिसर मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकांणांपैकी एक असून मुंबईतील पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर यांना जोडला जातो. घाटकोपर परिसरात हिंदुबहुल लोक जास्त प्रमाणात राहत असून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे.

हे ही वाचा:

 
 
Follow Us
 
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss