spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बोहरा समाजाच्या कार्यक्रमात सादर केलेल्या व्हिडिओमुळे पंतप्रधान नाराज?, जो व्हिडीओ पहिला आहे त्याबद्दल…

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळेस केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी भाषण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनी देखील देशाला संबोधित केले. पुढे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंधेरी मरोळ येथील अलजेमा-तूस-सैफी संकुलाच्या उदघाटनाची कार्यक्रमासाठी रवाना झाले. या वेळेस नरेंद्र मोदी यांनी अंधेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बोहरा समाजाच्या कार्यक्रमामध्ये देखील भाषण केलं आहे. परंतु या भाषणाच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे नाराज आहेत का असे देखील अनेकांना प्रश्न पडू लागले.

हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिनाभरात दुसरा दौरा आहे. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सीएसएमटी स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ मिनिटाचा व्हिडिओद्वारे अहवाल सादर करण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाद्वारे देशाला संबोधित केलं आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात बोहरा समाजाबद्दल सांगितलं की “या समुदायाने काळानुसार बदल आणि विकासाच्या कसोटीवर नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. मला मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अलजेमा-तूस-सैफी संकुलाच्या कार्यक्रमात उपस्थित अन्य सगळे मान्यवर तुम्हा सर्वांमध्ये येणं हे मला कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटत” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की मी आता जो व्हिडीओ पहिला आहे, त्याबद्दल माझी एक तक्रार आहे. माझी इच्छा आहे की यात सुधार व्हायला हवी. त्या व्हिडिओमध्ये सतत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रधानमंत्री बोलले गेले आहे. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे मी इथले नाही पपंतप्रधान आहे नाही मुख्यमंत्री. आणि कदाचित मला जे सौभाग्य मिळाले आहे ते कदाचित भरपूर कमी लोकांना मिळालं असेल. मी चार पिढी या कुटुंबाशी (बोहरा समाज) जोडलेली आहे”. असे पंतप्रधानांनी यांच्या भाषणात सांगितले आहे.

हे ही वाचा : 

आता मुंबई- शिर्डी आणि मुंबई-सोलापूर प्रवास होणार आणखी सुपरफास्ट, जाणून घ्या वंदे भारत एक्स्प्रेसची सविस्तर माहिती

Vande Bharat Express ला इगतपुरीत नो स्टॉप, तर नाशिकला फक्त दोनच मिनिट स्टॉप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss