खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जातंय, Senate Election अराजकीय व्हावे – Ashish Shelar

खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जातंय, Senate Election अराजकीय व्हावे – Ashish Shelar

सिनेट निवडणुकीत  (Senate Election) उबाठा (UBT) सेनेचे उमेदवार हे विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचे हित जोपासणारे असून त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फसला जात आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार  (Adv. Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अँड आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले की, सिनेटच्या उद्या होऊ घातलेल्या निवडणूका अराजकीय व्हाव्यात अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार उबाठा (UBT) गटाने दिले आहेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का? असा सवाल विचारत आशिष शेलार म्हणाले की, सगळ्या निवडणुकीची राजकीय बोळवण केली आहे. बोगस मतदार नोंदणी (Voting Registration) झाली तेव्हा आम्ही आक्षेप घेतला होता. आधी नोंदवले गेलेले पदवीधर सेनेच्या शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते.

निवडणुकीय राजकीय पक्षाचे झेंडे दिसू नयेत अशी कुलगुरूंना विनंती असून अभाविप (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) विद्यार्थ्यांसाठीची एकमेव संघटना आहे. दरम्यान, अभाविप (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) चे मुख्यमंत्र्यांवर आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अँड शेलार म्हणाले की, त्यांना मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे मात्र अभाविपच्या मताशी भाजप सहमत नाही.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी भाजप शिंदेंचं चक्रव्यूह अशा बातम्या आल्या आहेत त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर अँड शेलार म्हणाले की, ही कपोलकल्पित बातमी आहे. भाजप (BJP), शिंदे सेना (Shinde Sena) आणि अजितदादांचा सामना करण्याची ताकद महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) हरवून बसली आहे म्हणून खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात आहे. जेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीहून हात हलवत आले आणि मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका मांडा असे म्हणाले. पण काँग्रेसने दाद दिली नाही. शरद  पवार यांनी फटकारले. खरं तर तेव्हाच काँग्रेस (Congress) आणि पवारांच्या राष्ट्रवादीने वेळ पडली तर ठाकरे सेनेला सोडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असा दावाही आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Rain Updates: राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version